
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१३० वा दिवस
"तस्मात्वमुत्तिष्ठ यशोलभस्व ।" म्हणून ऊठ आणि यश, कीर्ती संपादन कर. केवढा दैवदुर्विलास पाहा ! येशू ख्रिस्त - युरोपीयांचे दैवत- त्यांची शिकवण अशी की, कुणाशी शत्रुत्व करू नकोस, जे तुमच्याशी शत्रुत्व करतात त्यांचेही शुभ चिंतावे. तुमच्या उजव्या गालावर कोणी थप्पड मारली तर डावा गाल पुढे करावा. सर्व कार्ये थांबवून परलोकाची वाट पाहावी, कारण जगाचा शेवट आता जवळ आला आहे. आणि गीतेत श्रीकृष्णांनी सांगितले की, खूप उत्साहाने काम करा, तुमच्या शत्रूचा निःपात करा आणि भूमितलावरील संपदा सुखाने भोगा. गीतेच्या संदेशानुसार आचरण कोण करीत आहेत ? युरोपीय लोक ! आणि ख्रिस्ताच्या शिकवणुकीचे आचरण कोण करीत आहेत? श्रीकृष्णाचे आपण वंशज.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष ५ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५
★ येशू ख्रिस्ताचा जन्मदिन नाताळ ख्रिसमस
★ १६४२ गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे थोर गणितज्ञ, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्रज्ञ सर आयलॅक न्यूटन यांचा जन्मदिन
★ १८६१ बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांचा जन्मदिन
★ १९२४ भारताचे दहावे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन
★ १९७२ भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा स्मृतीदिन
★ १९७७ ऑस्कर पारितोषिक विजेते अभिनेते, दिग्दर्शक, विनोदवीर चार्ली चॅपलिन यांचा स्मृतीदिन
★ १९९४ भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
