
मनमाड (प्रतिनिधी ) नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडीयम येथे ख्रिसमस नाताळ आनंदात साजरा करण्यात आला.येशुचे प्रतिमा पूजन शाळेचे मुख्याध्यापिका आहेर शितल यांच्या हस्ते करण्यात आले.

मोठया विद्यार्थ्यांनी येशू च्या जन्म ठिकाण ची प्रतिमा तयार करून सजावट केली तर लहान वयोगटातील विद्यार्थी सांताक्रूझ वेषात आले. शिक्षिका बोधडे एकता यांनी विध्यार्थ्यांना नाताळ सणाचे माहिती दिली.तर सांतकृझ चे आगमन काही विदयार्थानी नृत्याद्वारे केले.सांताक्लाॅज च्या हस्ते विद्यार्थ्यांना चाॅकलेट, पेन-पेन्सिल- रबर ई. बक्षीस मिळाले.

त्यानंतर विदयार्थ्यांना घेऊन शामची आई नाटक सादर केले.कार्यक्रमाची सांगता खरा तो एकची धर्म प्रार्थनेने झाली.
सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
