
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१८३ वा दिवस
कर्मयोग्याच्या मनात हे मी केले अशी जाणीवच नसते. तो निखळ, निष्काम, निःस्वार्थ भावनेने आणि प्रेमाने काम करत असतो. त्याचे फळ मिळेल याची अपेक्षा करत नाही. मानवतेच्या आणि निसर्गदेवतेच्या चरणाशी निष्काम भावनेने अर्पण केलेल्या सेवेने अनासक्ती योग साधतो. खऱ्या यशाचे खऱ्या आनंदाचे रहस्य हे आहे की जो निष्काम, निरपेक्ष आहे त्यालाच ते प्राप्त होते. जे लोक निःस्वार्थी असतात त्यांच्या वाटेला नेहमीच विवंचना आणि दुःख येते. एखादा माणूस खरोखर यशस्वी झालेला दिसत असेल तर त्यामागे विलक्षण सचोटी, तळमळ, प्रामाणिक प्रयत्न आणि व्यक्तित्वाचे सामर्थ्य असते. कदाचित तो पूर्णपणे निष्काम नसेल पण त्याची त्या दिशेने वाटचाल चाललेली असते. माणसाजवळ निःस्वार्थपणा, निष्कामता, प्रेम किती आहे यावरच त्याच्या यशाचे मोजमाप केले जाते.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास २७ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६
★ १७४५ मराठा साम्राज्यातील १६ व्या वर्षी पेशवेपदावर विराजमान झालेले अत्यंत कर्तबगार पेशवे थोरले माधवराव पेशवे यांचा जन्मदिन
★ १९४४ भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचा स्मृतीदिन
★ २०१५ महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा स्मृतीदिन.
