
नाशिक (प्रतिनिधी ) नाशिक येथे झालेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत चांडक कन्या विद्यालयाच्या ‘सेल्फी’ या एकांकिकेने शहरी विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेते श्री. दीपक करंजीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. भरत केळकर प्रमुख पाहुणे होते तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. एम्. जी. कुलकर्णी व सेक्रेटरी श्री. अश्विनीकुमार येवला उपस्थित होते. ‘सेल्फी’ या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन संयुक्ता कुलकर्णी यांनी केले होते. या एकांकिकेतून आत्मविश्वास व आत्मस्वीकृतीचा संदेश देण्यात आला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट स्त्रीपात्र अभिनयाचा पुरस्कार आरोही ठोके हिला, सर्वोत्कृष्ट पुरुष पात्र अभिनयाचा पुरस्कार स्नेहल चकोर हिला आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक संयुक्ता कुलकर्णी यांना देण्यात आले. या यशामागे विद्यालयाचे अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे, नेपथ्यकार सोनाली मोरे, संगीतकार दीपक गायकवाड व संपूर्ण नाट्यसंघाचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
