मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात स्काऊट गाईड अंतर्गत 'आनंद मेळाव्याचे' उद्घाटन करताना तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे - पाटील, दिपक आण्णा म्हस्के, बाळासाहेब कदम, विजय काकळीज, अशोक जाधव, ज्योती काळे इ.
नांदगाव:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी साने गुरुजी व लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन व स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण नियोजित अध्यक्ष इंजि. अमित भाऊ बोरसे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मंचावर दिपक आण्णा म्हस्के, रमेश अण्णा बोरसे,बाळासाहेब कदम, राजेश पाटील, अशोक जाधव, विजय काकळीज,भावेश पाटील,शरद देशमुख, दत्तात्रय कोल्हे,बापू घोडके, ठाकरे सर, साळूंके सर, चव्हाण सर,मराठे सर, गायकवाड सर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी केले.त्यांनी स्काऊट आणि गाईडची ही केवळ शिस्त आणि सेवा शिकवत नाही, तर ती जीवनातील व्यावहारिक कौशल्येही शिकवते. "स्वावलंबन व शिस्त" या तत्वाची ओळख करून देणे, व्यावसायिक ज्ञान मिळवणे आणि संघटित होऊन काम करण्याचा आनंद घेणे,हा मुख्य उद्देश आहे हे सांगितले.
आज या मेळाव्यात आमच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, पुरणपोळी स्टॉल,भाजीपाला स्टॉल, कडधान्य स्टॉल, मनोरंजन खेळाचे आयोजन केले होते. या स्टाॅल च्या माध्यमातून गणिताचे व्यवहार ज्ञान, संवाद कौशल्य आणि बाजारपेठेचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
श्री विजय काकळीज यांनी हा उपक्रम पाठ्यपुस्तकांपलकडील जीवन शिक्षण देणारा आहे हे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात इंजि. अमित भाऊ बोरसे - पाटील यांनी सर्व या मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची ओळख, नेतृत्व आणि सांघिक भावना, कल्पकता आणि सृजनशीलता, संवाद कौशल्य विकास, श्रमप्रतिष्ठा आणि जबाबदारी, सामाजिक बांधिलकी आणि अभ्यासातून विरंगुळा इत्यादी गुणांचा विकास होत असतो. आनंद मेळावा हा केवळ खेळाचा भाग नसून तो ' अनुभवातून शिक्षण ' देणारा उपक्रम आहे हे सांगितले.हा मेळावा 'संस्कार' आणि 'आनंदाचा' संगम आहे. त्यांनी साने गुरुजी यांच्या कार्याचा आढावा घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता स्काऊट गाईड प्रमुख अशोक मार्कंड, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर तर आभार प्रदर्शन राजेंद्र कदम यांनी केले.