
होरायझन अकॅडमीत क्रीडा संमेलनाचे आयोजन
मांडवड (प्रतिनिधी)
मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन अकॅडमी,नांदगाव शाळेत वार्षिक क्रीडा संमेलनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.या क्रीडा संमेलनाचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाजाचे, नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित बोरसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

याप्रसंगी इंजि.अमित बोरसे- पाटील उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळांकडेही लक्ष द्यावे. खेळांच्या माध्यमातून संघभावना शिस्त व आत्मविश्वास वाढतो स्मरणशक्ती वाढते त्याचप्रमाणे शारीरिक दृष्ट्या सदृढ बनण्यासाठी मदत होते. असे क्रीडा संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिव छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते विष्णू निकम,विजय काकळीज, रामनाथ गायकवाड,दीपक मस्के, उल्हास आहेर ,डॉ. गणेश चव्हाण,ज्ञानदेव कवडे ,रवींद्र कवडे,भावेश पाटील,बाळू कदम, शांताराम कवडे ,स्नेहल देशमुख, रमेश बोरसे ,दादा राठोड ,जे.आर.काळे,एच.बी.ठाकरे,एस.ए. मराठे,पी.व्ही. पगार,धनराज काकळीज,होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेच्या प्राचार्या पुनम मढे आदी उपस्थित होते.

शाळेच्या क्रीडा संमेलनात कबड्डी ,खो-खो, धावणे, पोतेउडी, रिले शर्यत, वूशू, कराटे,कुस्ती तसेच विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खेळामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपली कौशल्य सादर केली. विजेत्या विद्यार्थ्यांना व संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विष्णू निकम सर तसेच शाळेच्या प्राचार्या पुनम मढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर संमेलनाप्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे तालुका संचालक इंजि. अमित बोरसे-पाटील यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे नियोजन शालेय क्रीडा शिक्षक पृथ्वीराज वडघुले, श्रीमती पल्लवी दौंड, श्रीमती वैष्णवी बिडगर यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धी देशपांडे सह इयत्ता सहावीचे विद्यार्थी काव्य वाळके व दर्श थोरात यांनी केले.आभार प्रदर्शन शालेय शिक्षिका श्रीमती शरयू आहेर यांनी मानले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
