
तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात साने गुरुजी जयंती निमित्त अभिवादन करताना,नायब तहसीलदार सागर मुंदडा,दत्ता वायचळे,डॉ.श्यामसुंदर झळके,विवेक जमधडे,राजेंद्र पोळ,शशिकांत सावंत,मेघा दराडे,सोनाली आहेर,दामोदर बर्वे आदी
सिन्नर ( प्रतिनिधी) ग्राहकांनी आपली फसवणूक टाळावी यासाठी ग्राहकांचे हक्क,त्यांना कायद्याने दिलेले संरक्षण याविषयी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अस्तित्वात आहे.त्याची माहिती करून घेतल्यास आपली फसवणूक होणार नाही असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे पदाधिकारी डॉ. श्यामसुंदर झळके यांनी केले.राष्ट्रीय ग्राहक हक्क दिना निमित्ताने येथील तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.व्यासपीठावर अन्न नागरी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक विवेक जमधडे,महामित्र दत्ता वायचळे,पुरवठा निरीक्षक राजेंद्र पोळ, दामोदर बर्वे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला नायब तहसीलदार सागर मुंदडा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली.यावेळी महामित्र दत्ता वायचळे त्यांनी ग्राहकांनी सतर्क राहून खरेदी करावी,तसेच वस्तू अथवा माल खरेदी करताना पक्की पावती घ्यावी जेणे करून ग्राहकांची फसवणूक होणार नाही.अध्यक्ष पदावरून बोलताना पुरवठा अधिकारी विवेक जमधडे यांनी ग्राहकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सजग राहून खरेदी करावी.तसेच ऑन लाइन खरेदी करताना काळजी घ्यावी.सोशल मीडियावर विविध प्रकारे विविध प्रकारच्या ॲप मधून आर्थिक फसवणूक होते.कोणतीही अनोळखी लिंक ओपन न करण्याचे आवाहन केले.प्रास्ताविकात पुरवठा निरीक्षक राजेंद्र पोळ यांनी ग्राहक हक्क दिनामागची भूमिका विषद करून ग्राहकांनी आपले हक्क ,अधिकारी जाणून घेण्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले.यावेळी संदीप रूपवते, प्रिया डांगे,प्रेरणा रूपवते, मेघा दराडे, शशिकांत सावंत,दिपाली राजपूत,गोविंद उगले,वसंत साबळे,सुधाकर भार्गवे,रामचंद्र दातरंगे, ज्ञानदेव निरगुडे,तुकाराम कर्डक आदी उपस्थित होते. पुरवठा लिपिक सोनाली आहेर यांनी आभार मानले.
