
मांडवड (प्रतिनिधी) म. वि.प्र. संचलित स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड विद्यालयात “वार्षिक स्नेहसंमेलन”मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणतंत्र न्यूज नांदगावचे कवी श्री. नारायणे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार संघ नांदगाव तालुक्याचे संजय मोरे तसेच लोकनामा न्यूज पत्रकार अनिल आव्हाड व साप्ताहिक अक्षर मंच महेश पेवाल उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात नारायने सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मविप्र समाज नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित करत असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी यावेळेस विविध वेशभूषा, नाटिका, एकांकिका, गोंधळ, भारुड, हिंदी, मराठी गाण्यांचं विविध कलागुण सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली

यावेळेस मंचावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत आहेर, सभासद रामराव मोहिते, वाल्मीक थेटे, दौलतराव आहेर, गंगाराम थेटे,तसेच मांडवड गावचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रसेन आहेर शालेय व्यवस्थापन सदस्य अशोक निकम, अजित आहेर, सुबोध थेटे, विजय आहेर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस जी.थेटे , पर्यवेक्षक महाले आर.एस. हे होते. सदर कार्यक्रमासाठी म.वि.प्र. सरचिटणीस नितीन ठाकरे, नांदगाव तालुका मविप्र संचालक इंजि. अमित बोरसे (पाटील) यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख श्रीम.बोरसे एम. एम., श्रीम.निकम आर. पी. यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सातपुते डी.पी. चोळके के.डी. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक संदीप आहे सर यांनी केले.

