
लेखक – शंकर नामदेव गच्चे जि.प.प्रा.शाळा वायवाडी ता.हिमायतनगर जि.नांदेड मो.नंबर – 8275390410
नाताळ हा सण जगभरात खूप उत्साहाने साजरा केला जातो. हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. नाताळचा दिवस हा येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.

त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. साधारणतः दरवर्षी २५ डिसेंबर च्या दिवशी नाताळ जगभरात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मश्रद्धेनुसार नाताळ १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पवित्र पर्वाची सुरुवात करतो. नाताळ (ख्रिसमस) कसा साजरा करतात? नाताळ हा सण म्हणजे ख्रिस्ती धर्मीयांसाठी आनंदाची पर्वणीच असतो. ह्या दिवशी लोक आपल्या घरांची रंगीबेरंगी आकर्षक रोषणाईने सजावट करतात. विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवले जातात.नाताळच्या दिवशी नाताळ वृक्ष म्हणजे ख्रिसमस ट्री उभारले जातात. ख्रिसमस ट्री हा सूचिपर्णी वृक्षापासून बनवला जातो.त्याची अतिशय सुंदर अशी सजावट केली जाते. नाताळच्या मध्यरात्री सांताक्लाॅज (नाताळबाबा ) येऊन लहान मुलांना भेटवस्तू देऊन जातो, असा समाज आहे. सांताक्लाॅजचे चित्रण साधारणतः लठ्ठ, वृद्ध, पांढऱ्या दाढीचा, चष्मा लावलेला, लाल अंगरखा घातलेला व्यक्ती असे केले जाते. असा हा सांताक्लाॅज लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवी सोबत घेऊन फिरतो असे समजले जाते.

यादिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू, फुले, ग्रीटिंग्स म्हणजेच शुभेच्छापत्रे देऊन आनंद साजरा करतात. नाताळच्या दिवशी रस्ते, घरे, दुकाने, मोठमोठे मॉल्स, हे सुंदर रोषणाईने आणि आकर्षक सजावटीने सजवले जातात. ह्या दिवशी दुकानांमध्ये विविध वस्तूंच्या किंमतीवर सवलतीही दिल्या जातात.या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात.रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात.ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅराॅल असे म्हणतात.पौर्वात्य ख्रिस्तसभेमध्ये तिसऱ्या शतकात आणि रोमन ख्रिस्तसभेमध्ये इ. सन ३०० च्या जवळपास नाताळ साजरा करण्यात येऊ लागला. रोम शहरात ही तारीख २५ डिसेंबर अशी ठरविण्यात आली. परंतु इतरत्र मात्र वेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जाई. रोममधील रोमन लोक सूर्याची देव म्हणून उपासना करीत. २२ डिसेंबरनंतर सूर्याचे दक्षिणायन संपून त्याचे उत्तरायण सुरू होते. व दिवस मोठा होऊ लागतो. रोमन लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार हा सूर्याचा जणू नवीन जन्म असतो. आपल्या देवाचा हा नवजन्म रोमन लोक मोठ्या आनंदाने साजरा करीत. कॉन्स्टन्टाईन या रोमन सम्राटाने याच सुमारास ख्रिस्ती धर्मस्वीकारला. त्याने ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्याची उपासना न करता सूर्याचा निर्माता आणि नीतिमत्तेचा सूर्य जो प्रभू येशू त्याची उपासना करणे सुरू केले. अशा प्रकारे २५ डिसेंबर हा दिवस रोमन कॅथोलिक ख्रिस्तसभेत येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.ख्रिस्त स्वतःच म्हणाला होता की मी जगाचा प्रकाश आहे. म्हणून ख्रिस्ती लीकानी नवप्रकाश देणाऱ्या ख्रिस्ताचा जन्म या दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली.नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत क्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ म्हणतात. नाताळची शुभेच्छापत्रेनाताळची शुभेच्छापत्रे कुटुंबातील सदस्य आणि आप्त, स्नेही यांना पाठवली जातात. पारंपरिक पत्रांमध्ये नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. काही पत्रांमध्ये बायबल मधील विचार, कविता इत्यादीचा समावेश असतो. बर्फाने व्यापलेला प्रदेश, नाताळबाबा, त्याची गाडी, ख्रिसमस ट्री अशी विविध चित्रे यामध्ये असतात. पहिले व्यावसायिक नाताळ शुभेच्छापत्र इ.स. १८४३ मध्ये सर हेन्री कोल यांनी बनवले. आता ही पद्धत जगभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेली दिसून येते.ख्रिसमस ट्रीनाताळचा सूचिपर्णी वृक्ष हा पगान संस्कृतीचा वृक्षपूजेचा एक भाग मानला जातो. त्याचा संबंध हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. ख्रिसमस ट्री असे संबोधन प्रथम इ.स. १८३५ मध्ये झालेले आढळते. आधुनिक काळातील या वृक्षाची सजावट हा भाग जर्मनीत उदय पावल्याचे समजतात. हे वृक्ष दिव्यांच्या माळा आणि अन्य सजावट साहित्यांनी सुशोभित केले जातात. लहान मुलांचे मोजे, छोट्या प्रतीकात्मक काठ्या, छोट्या घंटा, भेटवस्तू अशा गोष्टी लावून हा वृक्ष सुशोभित केला जातो. सजविला जातो. काही ठिकाणी विशेषतः प्रार्थनास्थळी येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो.सांताक्लाॅजसांताक्लॉज किंवा संत निकोलस हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. सांताक्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळबाबा असे म्हणतात. पाश्चिमात्य ख्रिश्चन संस्कृतीत मानले जाते की चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना नाताळच्या आदल्या रात्री (नाताळबाबा) सांताक्लॉज भेटवस्तू देऊन जातात.सांताक्लाॅजचे चित्रण सामान्यतः बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली, चष्मा लावलेली व्यक्ती असे केले जाते. लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवीही याच्यासोबत असते. अमेरिका आणि कॅनडा या देशांत ही व्यक्तिरेखा १९व्या शतकापासून विशेष लोकप्रिय झाली.नाताळ गीते (कॅरॉल्स) नाताळला सजवलेला ख्रिसमस ट्रीनाताळला भारतातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना होते. या दिवशी चर्चमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात गर्दी असते. प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्चमध्ये येतात.[१४] भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या अवघी २.३% (१.२४ कोटी) आहे. तरी नाताळला भारतात ही सार्वजनिक सुट्टी असते. ख्रिस्ती मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्येही ख्रिसमस साजरा केला जातो.
