
नांदगाव (प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्या वतीने आयोजित ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात’ ‘डिजिटल साक्षरता व आजचा युवक’ या विषयावर प्रा.श्रीमती सरोज कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, रोबोटिक्स यांचा मानवी जीवनात होत असणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीतील वापराबाबत विविध उदाहरणे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाईन प्लॅटफॉर्मस् चा वापर आपण दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणावर करत असतो काही प्रसंगी आपली फसवणूक होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याजवळ असणारी गोपनीय माहिती,ओटीपी, पासवर्डची माहिती मागणीकर्त्यांना देऊ नये यासंबंधीही त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. कौशल्यपूर्ण डिजिटल साक्षरतेचे ज्ञान असणारा व्यक्ती त्यातून अर्थाजनही करू शकतो असे त्यांनी सुतोवाच केले. डिजिटल साक्षरतेचा आपल्या दैनंदिन जीवनात चांगल्या कामासाठी वापर करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी शिबिरार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.सी.पैठणकर व सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीमती टी.एन.आहेर यांनी परिश्रम घेतले.
