
सिन्नर (प्रतिनिधी)२४ डिसेंबर २०२५ सानेगुरुजी यांची १२६ वी जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की साने गुरुजींनी अस्पृश्यता, जातीयता, आणि अंधश्रद्धांवर प्रहार केला. त्यांनी सर्वधर्म समभाव, समता, आणि सहिष्णुतेचा प्रचार केला. त्यांच्या लेखणीतून समाजाला प्रबोधन केले आणि वंचित वर्गाला त्यांचे हक्क समजून सांगीतले.त्यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे ब्रिटिश सरकारविरुद्घ परखड भाषण केल्याबद्दल त्यांना धुळे येथील तुरुंगात टाखले तुरुंगातून सुटल्यावर.त्यांनी १९४० च्या दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला.अशा महान विचारवंत साने गुरूजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
यावेळी डाॅ.आर टी जाधव यांनी साने गुरुजींच्या जीवना आधारित आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार राजेंद्र सातपुते यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, डाॅ.आर टी.जाधव प्रकाश माळी संतोष क्षत्रिय, राजेंद्र देशमुख सुनिल भालेराव, दर्शन चव्हाणके, मनोज माळी शरद शिरसाठ अजय कुलकर्णी, धनंजय परदेश राजेंद्र सातपुते आदि.उपस्थित होते
