
ओझर: दि.२४ वार्ताहर
येथील ‘मविप्र’ संचालित माधवराव बोरस्ते विद्यालयात साहित्यिक, समाजसुधारक पांडुरंग सदाशिव साने (गुरुजी) यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे दादासाहेब सोनवणे बाबासाहेब लभडे यांनी केले. प्रास्ताविक शिक्षिका मेघा शेजवळ यांनी केले.इ.सातवी क या वर्गातील विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील काही प्रसंग नाट्यीकरणाद्वारे सादरीकरण केले. शिक्षिका लता आहेर यांनी साने गुरुजी यांच्यावर झालेले संस्कार व आई चे मन व शिक्षण यावर आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी साने गुरुजींच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरुजी लिखित प्रार्थना व देशभक्ती गीत सादर करून साहित्याचे वाचन केले. ललित धनगर या विद्यार्थ्यांने वाढदिवसा निमित्त ‘आपली संस्कृती’ हे साने गुरुजींचे पुस्तक विद्यालयाला भेट दिले. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत ,रेखा देशमाने उपस्थित होते.फलक रेखाटन कला शिक्षिका सविता पवार यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.
