
मांडवड (प्रतिनिधी) शिक्षण विभाग पंचायत समिती नांदगाव,तालुका अध्यापक संघ नांदगाव व स्व. शरद आण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वे नांदगाव तालुका विज्ञान प्रदर्शन मांडवड येथे उत्साहात पार पडले. पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ व विज्ञान प्रतिकृती मांडणी तर दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.वि.प्र. संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित भाऊ बोरसे पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे उपस्थित होते. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर नांदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे, मांडवड गावातील मविप्र सभासद, मार्गदर्शक रमेश अण्णा बोरसे, नांदगाव महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटील पत्रकार राजेंद्र तळेकर, पत्रकार चंद्रकांत भालेराव,प्रकल्प पाटील, सुशील भाऊ आंबेकर, योगेश भाऊ आहेर दत्तात्रय निकम, पंचायत समिती नांदगाव सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बच्छाव व सर्व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक थेटे एस. जी. पर्यवेक्षक महाले आर. एस. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर प्रदर्शनामध्ये 50 हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला यामध्ये बक्षीस विजेत्या शाळा पुढील प्रमाणे
प्राथमिक विभाग
प्रथम क्रमांक स्मार्ट ब्लो पीरियॉर्ड
शाळा -व्ही. जे. हायस्कूल,नांदगाव
द्वितीय क्रमांक- रेल्वे विरहित मालवाहतूक
शाळा- छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
तृतीय क्रमांक_ बायोगॅस फ्रॉम वेस्टेड पाईप
शाळा_ सेंट झेवियर हायस्कूल मनमाड
माध्यमिक विभाग
प्रथम क्रमांक वुमेन सेफ्टी डिवाइस
शाळा के एम के विद्यालय नांदगाव
द्वितीय क्रमांक रेल्वे अपघात टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान
शाळा माध्यमिक विद्यालय साकोरे
तृतीय क्रमांक बहुउपयोगी सायकल
शाळा स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री परदेशी एच. टी.यांनी केले. तर आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक संदीप आहेर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
