
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१२९ वा दिवस
प्रत्येक देशात असे थोर महापुरुष असतात जे फक्त कर्मासाठीच कर्म करीत असतात. ते नाव, यश, कीर्ती आणि स्वर्गप्राप्ती यापैकी कशाचीही पर्वा करीत नाही. ते फक्त काहीतरी चांगले व्हावे, लोकांचे कल्याण व्हावे याच भावनेने कर्म करीत असतात. काही लोक तर याहुनी उच्चकोटीचे असतात ते गरिबांचे भले करण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांना मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. कारण त्यांचा चांगुलपणावर विश्वास असतो आणि त्यावर ते प्रेम करीत असतात. नाव किंवा यश मिळवण्यासाठी केलेले कार्य हे लवकर फळास येत नाही. या गोष्टी आपल्याला अशावेळी मिळतात जेव्हा आपण म्हातारे झालेलो असतो किंवा आयुष्यातील शेवटच्या घटका मोजत असतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष ३ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५
★ १५२४ पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को – द – गामा यांचा स्मृतीदिन
★ १८९९ नामवंत साहित्यिक, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरुजी यांचा जन्मदिन
★ १९२४ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्मदिन
★ भारतीय ग्राहक संरक्षण दिन.
