
कडोली-बेळगाव येथील साहित्य संमेलनात व्याख्यानासाठी विशेष निमंत्रण
नाशिक:(प्रतिनिधी )-मराठी साहित्य संघ, कडोली, जि. बेळगाव (कर्नाटक) आयोजित दि. ११ जानेवारी २०२६ रोजी होऊ घातलेल्या एक्केचाळीसाव्या मराठी साहित्य संमेलनात व्याख्यानाचा बहुमान प्रसिद्ध कवी, लेखक व व्याख्याते प्रा. राजेश्वर शेळके यांना मिळाला आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील कडोली-बेळगांव येथे १९८६ पासून गेली चार दशके दरवर्षी साहित्य संमेलन होत असते. बेळगांव परिसरातील मराठी साहित्य संमेलनांची मुहूर्तमेढ कडोली संमेलनाने रोवली. आजवर श्रीमती माधवी देसाई (१९८६), कै. इंदिरा संत (१९८७), डॉ. आनंद यादव (१९८८), श्रीमती अनुराधा गुरव (१९८९), स्वामीकार कै. रणजित देसाई (१९९०), डॉ भालचंद्र नेमाडे (१९९१), डॉ. गो. मा. पवार (१९९२), बाबा कदम (१९९३), मधु मंगेश कर्णिक (१९९४), द. मा. मिरासदार (१९९५), डॉ. अनिल अवचट (१९९६), सौ. अनुराधा वैद्य (१९९७), डॉ. वामनराव कटांबळे (१९९८), प्रा. गोपाळराव मयेकर (१९९९), विजय कुवळेकर (२०००), उचल्याकार लक्ष्मण गायकवाड (२००१), कै. अशोकजी परांजपे (२००२), पानिपतकार विश्वास पाटील (२००३), कै. डॉ. निर्मलकुमार फडकुले (२००४), अरूण साधू (२००५), डॉ. रामचंद्र देखणे (२००६), डॉ. नागनाथ कोतापल्ले (२००७), उपराकार लक्ष्मण माने (२००८) डॉ. अशोक कामत (२००९), रा. रं. बोराडे (२०१० रौप्य महोत्सवी वर्ष), डॉ. अनंत दिक्षीत (२०११), प्रा. रामनाथ चव्हाण (२०१२), लोकशाहीर संभाजी भगत (२०१३), प्रा. कृष्णात खोत (२०१४), दिनानाथ मनोहर (२०१५) यांसह अनेक दिग्गज साहित्यिकांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. आजवर महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यातील नामवंत कवींनी या संमेलनासाठी हजेरी लावली आहे; तर व्याख्यान, कथाकथन आणि परिसंवादाच्या कार्यक्रमात प्रा. म. द. हातकणंगलेकर, विष्णू सूर्या वाघ, डॉ. अच्युत माने, उत्तम कांबळे, नारायण अतिवाडकर, ज्ञानेश्वर मुळे, सुभाष माने, महादेव मोरे, विलास मोहिते, अनंतराव कुलकर्णी, अशोक वाळगी, रमा मराठे, चंद्रकांत केदारी, वा. पु. गिंडे, डॉ. जया नातु, मालोजीराव अष्टेकर, आनंद पाटील, विनोद गायकवाड, आप्पासाहेब खोत, वामन होवाळ, विठ्ठल ठाकूर, माणिक पटवर्धन, बी. आर. पाटील, एम. डी. लहानकर, मंदाकिनी गोडसे, प्रा. लक्ष्मण डोबळे, नरेंद्र दाभोळकर, आनंद गोगटे, स्वाती परळकर, माधुरी शानभाग, मृणालिनी पटवर्धन, तारा भवाळकर, रवींद्र पिंगे, शंकर सारडा, राजन गवस, अनंत सामंत, ह. मो. मराठे, सुहास शिरवळकर, बाळासाहेब परिट, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, सिमा नरगुंदकर, नामदेव माळी, डॉ. शंकरराव मगर, प्रा. रवींद्र कोकरे, अभय भंडारी, डॉ. पी. बी. पाटील (सांगली), हिंमत पाटील, संध्या चौगुले, जोतिराम फडतरे, श्रीनिवास खांदेवाले, द. ना. देसाई, विजय जाधव, प्रा. आनंद मेणसे, डॉ. अमर अडके यांसारख्या श्रेष्ठ विचारवंतांनी या व्यासपीठावरून आपले विचार मांडले आहेत. या परंपरेत प्रा. राजेश्वर शेळके यांना स्थान मिळाल्याने नाशिकच्या साहित्य वर्तुळातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. प्रा. शेळके या संमेलनात ‘या जगण्याचे पैलू शंभर!’ या विषयावर त्यांचे विचार मांडणार आहेत.
