
मुंबई (प्रतिनिधी )महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक व भाषाभ्यासक डॉ. विठ्ठल वाघ यांना महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागातर्फे दिला जाणारा डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!या पुरस्काराचे स्वरूप ₹२ लाख रोख, मानचिन्ह व मानपत्र असे असून, मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाची ही सन्मानाची पावती आहे. डॉ. विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडी म्हणी, वऱ्हाडी बोलीचे संशोधन, तसेच देश-विदेशात काव्यवाचनातून समाजप्रबोधन, कविता, कांदबऱ्या व संशोधनात्मक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत भरीव कार्य केले आहे.मराठी भाषेची समृद्धी आणि लोकभाषेचा सन्मान जपणाऱ्या त्यांच्या कार्याला सलाम!पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!
