
त्र्यंबकेश्वर येथील पिंपळद या गावात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व के के वाघ वरिष्ठ महाविद्यालय नाशिक येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत सात दिवसीय निवासी हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले होते
या संपूर्ण सात दिवसीय शिबिरामध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या विषयानुसार शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व पडीक जमीन व्यवस्थापण यावर आधारित वनराई बंधारा , CCD, जलसंधारण, स्वच्छता ,आरोग्य, व सांस्कृतिक कलागुणांचे जतन यासंबंधी विविध उपक्रम राबविण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन 16 डिसेंबर रोजी पिंपळद गावचे सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व के के वाघ शैक्षणिक संकुल चे समन्वयक, विश्वस्त महाविद्यालयाचे प्राचार्य, उप प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले या सात दिवसीय शिबिरामध्ये रोजची कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरी ,व्यायाम ,गाव स्वच्छता मोहीम राबवून, ध्यानधारणा घेण्यात आले.
विविध खेळ व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
दररोज स्वयंसेवकांनी श्रमदान करून प्रत्यक्ष खेड्यातील दैनंदिन जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला शिबिरात विविध व्याख्याने आयोजित करण्यात आले या शिबिराप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर रवींद्र अहिरे यांनी शिबिरात प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना व पुणे विद्यापीठ किती उमेदीने काम करत आहे असे विविध प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत तसेच त्यांनी संपूर्ण स्वयंसेवकांचे कौतुक केले या दरम्यान पिंपळद परिसरातील असणारे विविध पाड्यांवरती विद्यार्थ्यांनी भेट दिल्या व त्या पाड्यांवर भजन संध्या , ग्राम स्वच्छता असे उपक्रम घेण्यात आले तसेच ऐतिहासिक जव्हार राजवाड्याला काही स्वयंसेवकांनी भेट दिली.
पिंपळद येथे शासनाचे विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिली विशेष करून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांचा प्रभावी फायदा कसा करून घेता येईल हे विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
तसेच वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
शिबिराचा समारोप 22 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला याप्रसंगी विवेकानंद केंद्र प्रकल्प प्रमुख आदरणीय चित्राताई देशपांडे या अध्यक्षस्थानी होत्या उपप्राचार्य डॉ. अनुराधा नांदुरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे खूप कौतुक केले तसेच गावातील सरपंच सौ. आशा काळू पोटिंदे, उपसरपंच सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. अर्चना बेंडाळे, प्रा. अर्चना कोते उपस्थित होते. या संपूर्ण शिबिराच्या आयोजनासाठी के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीर वाघ, श्री अजिंक्य वाघ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
तसेच के के वाघ शैक्षणिक संकुल समन्वयक व विश्वस्त डॉ. व्ही एम सेवलीकर, प्राचार्य डॉ. संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मयूर उशीर, प्रा. दामिनी करसाळे, प्रा. दिनेश आंबेकर यांनी विशेष प्रयत्न करून शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.
या सात दिवसीय शिबिरामुळे स्वयंसेवकांमध्ये समाजभान नेतृत्व गुण श्रमप्रतिष्ठा पर्यावरण संवर्धन स्वावलंबन सर्व गोष्टींची जाणीव निर्माण झाली. या शिबिरामध्ये एकूण १३५ स्वयंसेवक उपस्थित होते.
या संपूर्ण शिबिरासाठी डॉ . गणेश भामे संचालक राष्ट्रीय सेवा योजना पुणे विद्यापीठ यांनी वेळोवेळी कार्यक्रम अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. गावकऱ्यांनी व सर्व सदस्यांनी शिबिराचे कौतुक करत एनएसएस स्वयंसेवकांचे आभार मानले.
