
साकोरे ( प्रतिनिधी ) पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचे माध्यमिक विद्यालय, साकोरे येथील विद्यार्थ्यांनी “रेल्वे अपघात टाळण्याचे नवीन तंत्रज्ञान” या विषयावर सादर केलेल्या प्रकल्पाने जिल्हास्तरीय विज्ञान/तंत्रज्ञान स्पर्धेत माध्यमिक गट (इयत्ता ९वी ते १२वी) मध्ये द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या उल्लेखनीय यशात मार्गदर्शक बोरसे ए. आर. सर तसेच सहभागी विद्यार्थी गणेश पोपट बोरसे व गौरव सोमनाथ पगारे यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी रेल्वे अपघात होऊ नयेत यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरण करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रकल्पाची जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय समिती, व्यवस्थापन समिती, माता-पालक समिती तसेच माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने मार्गदर्शक शिक्षक व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
साकोरे विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून भविष्यातही विद्यार्थी अशाच नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे उज्वल यश संपादन करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
