
अंदरसूल (प्रकाश साबरे) होरायझन अकॅडमी येवला शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अबॅकस स्पर्धेत यश मिळवले. आय जीनियस अबॅकस अकॅडमीने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन केले होते. या परीक्षेत विद्यार्थ्यांना केवळ १० मिनिटांत १०० प्रश्न सोडवायचे होते. ज्यामुळे त्यांचा वेग, अचूकता आणि एकाग्रता तपासली गेली.
होरायझन अकॅडमी येवला शाळेचे ५१ विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते.३० विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा २०२६ साठी पात्र झाले.
१०० गुणांसह तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
९९ गुणांसह चार विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
९८ गुणांसह चार विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
याशिवाय १९ विद्यार्थ्यांनी ९१ पेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्राविण्य दाखवले.
या यशाबद्दल नितीनजी ठाकरे सर, सरचिटणीस मविप्र नाशिक.
. दिलीप दळवी सर, चिटणीस मविप्र नाशिक. लक्ष्मण लांडगे सर. संचालक नाशिक. आर. के. बच्छाव सर संचालक मालेगाव सी. डी. शिंदे सर संचालक शिक्षक प्रतिनिधी डी.डी जाधव सर
शिक्षणाधिकारी मराठी माध्यम एस.
शिंदे सर शिक्षणाधिकारी इंग्रजी माध्यम
सर्व संचालक मंडळ आणि शिक्षणाधिकारी मविप्र समिती सदस्य तसेच आदरणीय श्रीमती सुनिता हिंगडे मॅडम मुख्याध्यापिका होरायझन अकॅडमी येवला. श्रीमती नीता पवार मॅडम आय जीनियस अकॅडमी प्रमुख. सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अबॅकस शिक्षिका सायली तनपुरे, सोनाली पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
