
अंदरसुल ( प्रतिनिधी ) रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रदेश अध्यक्ष मा प्रा श्री.रमेश जी आवटे सर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात सप्तशृंगी माता गड वणी जिल्हा नाशिक येथे संपन्न झाली .

सप्तशृंगी गडावरील अन्नपूर्णा हॉलमध्ये सकाळी ठीक बारा वाजता अंदाजे 500 सभासदांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष प्रा. मा.श्री रमेश जी आवटे सर हे होते, तर संस्थेचे सरचिटणीस श्री. चंद्रशेखर (बाळासाहेब) होनराव, कोषाध्यक्ष श्री. सुरेंद्र जी गाडवे, उपाध्यक्ष श्री. शिवशंकर आप्पा लातूरे, श्री सुनील गाताडे, श्री. जगदीश घोडके, सहचिटणीस ॲड श्री. बी. आर. सोनटक्के, श्री. राजन मिसाळे, श्री. विजय नांदेकर, प्रदेश संघटक श्री. अंबादास आंधळकर प्रदेश सदस्य श्री. रवींद्र बुकटे, महिला आघाडीच्या सौ. विद्याताई घोडके, जिल्हा महिला अध्यक्ष सौ. संध्या ताई निळकंठ, सौ. शारदाताई गाडे, सौ. शैलाताई तोडकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच ज्ञात अज्ञात समाज बांधव व भगिनींना तसेच माजी केंद्रीय मंत्री कै. शिवराज पाटील चाकूरकर, महाराष्ट्राचे माजी मंत्री कै. भारत बोंद्रे, कै. बद्रीनाथ अप्पा वाळेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तदनंतर सभेला सुरुवात झाली.
वीरशैव लिंगायत सभेचे सरचिटणीस मा.श्री. बाळासाहेब होनराव यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाची सुरुवात केली.
१)मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला.
२ ) न्यासाचे धर्मदाय सहआयुक्त कार्यालयीन बदल अर्ज पूर्ण केल्याबद्दल सविस्तर माहिती सभागृहास दिली.
३)न्यासाचा लेखा परीक्षण अहवाल सादर केला.
४)घटनाबाह्य व बेजबाबदार वर्तन करणाऱ्या सदस्यांवर कारवाई बद्दल नियमात बदल केल्याबद्दल सभागृहास माहिती दिली.
५) कार्यकारीणी कालावधी 3 वर्षावरून 5 वर्ष करण्याचा प्रस्ताव सादर केला, व सर्व सदस्यांनी त्यास एकमताने मंजुरी दिली.
६)संस्थेने कार्यालयासाठी पुणे येथे मध्यवर्ती ठिकाणी 1200चौरस फुटांची प्रशस्त सदनिका खरेदी केली, त्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष आणि अग्रगण्य उद्योगपती श्री. शिवशंकर आप्पा लातूरे साहेब यांनी अतिशय बहुमूल्य असे आर्थिक योगदान देऊन संस्थेस मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल सभागृहाने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून अभिनंदन केले.
तसेच सर्वसाधारण सभेसाठी सुसज्ज आणि भव्य असे सभागृह, राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि सर्वांसाठी माता सप्तशृंगीच्या दर्शनाची व्यवस्था इत्यादी मोफत उपलब्ध करून देऊन महान दातृत्वाचे दर्शन घडवले निस्वार्थ सेवाभाव कसा असावा याचे हे मूर्तीमंत उदाहरण. यापुढेही संस्थेच्या सर्व कार्यात तन मन आणि धनाने योगदान देण्याचे आश्वासन श्री.लातूरे साहेब यांनी दिले, त्याबद्दल संपूर्ण समाज त्यांचे ऋणी राहील.🙏
त्यानंतर संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज बांधवांना शाल, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार.
1) मा.श्री. दत्ताअप्पा इटके, परळी वै. बीड.
2) मा. श्री. शिवशंकर अप्पा लातूरे, मुंबई.
3) मा.श्री.राजेंद्र विश्वनाथ आप्पा हुरणे, नांदेड .
4)मा.श्री. बबनआप्पा साखळीकर ,बुलढाणा.
5) मा.डॉ.श्री. राज वसंत राव नगरकर, नाशिक.
राज्यस्तरीय आदर्श महिला भूषण पुरस्कार.
1) मा.सौ. कुसुमताई निळकंठ,पिंपळगाव ब. नाशिक.
2) मा.सौ. ज्योतीताई फिस्के, बुलढाणा.
राज्यस्तरीय आदर्श जिल्हा समिती पुरस्कार.
🌷 नांदेड जिल्हा.
🌷 कोल्हापूर जिल्हा.
🌷 धुळे जिल्हा.
🌷 नाशिक जिल्हा.
राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार.
सातपूर नाशिक येथे ज. म. बसवेश्वर महाराज मंदिर उभारण्यात योगदान दिल्याबद्दल,
🌷मा.श्री. धोंडूनाना हिंगमिरे.
🌷 मा.डॉ.श्री. संदेश हिंगमिरे.
🌷 मा.श्री. प्रवीण डांगे.
आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या समाज बांधवांचे संस्थेच्या वतीने आणि समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. संस्थेच्या वतीने सर्व विजयी उमेदवारांना अभिनंदनपर पत्र देण्याचे ठरले.
शेवटी सभेचे प्रांतिक अध्यक्ष मा.प्रा.श्री.रमेश जी आवटे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यात त्यांनी आपल्या उत्कृष्ट भाषण शैलीने आणि ओघवत्या वाणीने संपूर्ण सभागृहास संबोधित केले. गेल्या 3 वर्षात संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. त्यात विशेष करून वधू वर मेळावे, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार, विविध सामाजिक उपक्रम, महिला मेळावे, रुद्र भूमी विषयी समस्या, याविषयी सविस्तर विवेचन केले.
त्याचप्रमाणे संस्थेच्या कार्यालयासाठी सदनिका खरेदी करण्यासंबंधी अग्रगण्य उद्योजक आणि संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. शिवशंकर आप्पा लातुरे साहेब यांनी जे बहुमोल आर्थिक योगदान देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. जगदीशआप्पा घोडके यांनी केले.
या संपूर्ण सभेचे आयोजन नाशिक जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात कुठलीही उणीवभासू दिली नाही.
जिल्हा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेऊन, सुयोग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.आदर्श सांघिक कार्य कसे असावे,याचे मूर्तिमंत उदाहरण नाशिककरांनी घडवले, त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने त्यांचे शतशः आभार आणि अभिनंदन.
सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून नाशिक जिल्हा समितीच्या वतीने सण 2026 च्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले त्याबद्दल जिल्हा समितीचे अध्यक्ष श्री अनिल आप्पा पठाडे व सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
सर्व साधारण सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सभासद बांधव उपस्थित होते. त्यातही महिला भगिनींची आणि वृद्धांची उपस्थिती उल्लेखनीय अशीच होती. उपस्थितांमध्ये धुळे, नांदेड, बीड,छ. संभाजीनगर, जालना, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, बुलढाणा, अकोला, धाराशिव, पुणे, सांगली इत्यादी जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गाव, तालुक्यातून असंख्य समाज बांधव व भगिनींनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. अभूतपूर्व अशा उपस्थितीने आणि सुयोग्य नियोजनामुळे हा मेळावा सर्व समाजाच्या चिरकाल स्मरणात राहील.
उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांना श्री. लातूरे साहेबांच्या टीमने सप्तशृंगी मातेचे मोफत दर्शन घडवले आणि संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अतिशय चोख आणि नम्र पणे सेवा दिली, त्याबद्दल तेथील सर्व सेवे कर्यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद.
कार्यक्रमाचे नियोजन आणि नेतृत्व नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री. अनिलअप्पा पठाडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केले, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. श्री. संदेश हिंगमिरे, श्री. अविनाश भाऊ आंधळकर, आणि श्री. महेश डबे यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली.
सुग्रास भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
वृत्तांकन:-विजय कुमार शाहीर ,छ.संभाजीनगर.
(म.प्रदेश रुद्र भूमि समस्या निवारण प्रमुख)
