
मनमाड :- मविप्र समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल मनमाड येथे जागतिक शेतकरी दिनाचे अवचित्त साधुन तुळशी वनस्पती चे दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून रोपांची वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आली.

मुख्याध्यापिका शितल आहेर तसेच विद्यार्थाच्या ,सर्व उपस्थितांचे हस्ते यांचे तुळशीचे पुजन, आरती करण्यात आले. सुभाष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक तुळशी चे महत्त्व, काळाची गरज, तुळस प्रत्येक आजारावरील रामबाण औषध कसे आहे ते पटवून दिले. सोबत रामभाऊ देवरे सरांनी तुळशीची पौराणिक कथेसोबत तुळशीचे विविध प्रकारांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक बिडगर मँडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.पालक विजय चव्हाण यांनी आभार मानले याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


