
नाशिक:- ( प्रतिनिधी ) गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित चौथ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे यांची आणि स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री सुनंदा पाटील यांची निवड करण्यात आली.
मखमलाबाद रोडवरील भावबंधन मंगल कार्यालयातील शिक्षणमहर्षी ॲड.संभाजीराव पगारे साहित्य नगरीत १७ आणि १८ जानेवारी या कालावधीत हे संमेलन होणार आहे. संमेलनाचे उदघाटन तमाशा सम्राट भिमा सांगवीकर यांच्या हस्ते होणार आहे. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते पहाटे ६ वाजेपर्यंत रंगणाऱ्या शेकोटी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले यांची निवड करण्यात आली आहे. लावणी स्पर्धेचे उदघाटन प्रख्यात लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे लोककला गौरव पुरस्काराचे यंदाचे मानकरी गणेश चंदनशिवे, लावणी सम्राज्ञी माधुरी पवार उपस्थित राहणार आहेत.
गेल्या तीन संमेलनांप्रमाणेच विविध कार्यक्रमांचे आयोजन यावर्षीही करण्यात आले आहे. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि स्वागताध्यक्षांचा शुक्रवार दि.२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता हुतात्मा स्मारकात सन्मान करण्यात येणार आहे. नाशिक कवी संस्थेचे अध्यक्ष इंजि.बाळासाहेब मगर, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, प्रवीण जोशी, ज्येष्ठ उद्योजक उत्तमराव शिंदे, माजी आ.नानासाहेब बोरस्ते, मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, प्रा.सुमती पवार, प्राचार्य प्र.द.कुलकर्णी, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सुहास टिपरे, विशाल टर्ले, किरण सोनार, मधुकर गिरी, सोमनाथ साखरे, तुकाराम ढिकले, प्रा.राजेश्वर शेळके, दशरथ झनकर, शितल कुयटे, भाग्यश्री चौधरी, पूजा दंडगव्हाळ, आशा गोवर्धने, रविकांत शार्दुल, संजय आहेर, प्रशांत कापसे आदींनी केले आहे.
संमेलनाध्यक्ष आणि स्वागताध्यक्षपदी साहित्य प्रांतातील दोन दिग्गज साहित्यिकांची निवड करण्यात आल्याने या संमेलनाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा अनोखा गौरव करण्यात आल्याचे संयोजकांनी कळवले आहे.
