
नांदगाव (प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना+2 स्तरच्या ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा’ म.वि.प्र. संचालक इंजि.अमितभाऊ बोरसे पाटील,मा.दिपक (आण्णा) म्हस्के व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षीय मनोगतातून इंजि.अमित बोरसे पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार प्राप्त होतात. समाजात वावरताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कौशल्य आत्मसात होते.राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होत असल्याचे सुतोवाच केले. त्यांनी आपल्या मनोगतातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशल इंटेलिजन्स) वापर कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासास सहाय्यभूत असल्याचे सांगितले. शिबीरार्थी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा आदर्श बाळगण्याचे आवाहन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन. भवरे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनाचे महत्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिले. शिबिर कालावधीत झालेले संस्कार विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निश्चितच कामी येत असल्याचे प्रतिपादित केले. स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. बाळासाहेब कवडे यांनी आपल्या मनोगतातून नांदगाव तालुक्यात सामाजिक कार्यामध्ये कै.वामनराव पाटील व त्यांचे आजोबा कै. कवडे बाबा यांनी दिलेल्या योगदानाची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.समाज उपयोगी कार्य करणारा व्यक्ती दीर्घकाळ कार्यरूपाने स्मरणात राहत असल्याने विद्यार्थ्यांनी समाजात आढळणाऱ्या चुकीच्या प्रथा, व्यसनाधीनता व गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले. सदर प्रसंगी मंचावर मा. दिपक (आण्णा) म्हस्के, कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.शरद पाटील,मा.विश्वासराव कवडे, मा.रमेश (आण्णा) बोरसे, मा. राहुल पवार,प्रथमेश पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम.राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना +2स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. जी.व्ही.बोरसे यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिबिरार्थी स्वयंसेवक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.सी. पैठणकर व सहाय्यक श्रीमती प्रा.टी.एन.आहेर यांनी परिश्रम घेतले.
