
नांदगाव(प्रतिनिधी) राष्ट्रीय गणित दिनानिमित्त के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक येथील गणित विभागाच्या वतीने GENIUS GRID KTHM COLLEGE MATH CHAMPIONSHIP–2025 या गणित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथील एकूण १२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेमधील मॉडेल एक्झिबिशन प्रकारात महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील *कु. आहेर रेवती जयवंत व कु. आहेर कोमल मोहन* या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत *द्वितीय* क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थिनींचा गौरव म. वि. प्र. संस्थेचे आदरणीय सरचिटणीस ॲड. मा. नितीनजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या गणित विभागाच्या वतीने संबंधित विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य आदरणीय डॉ. आर. एन. भवरे सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. आर. टी. बिन्नर व प्रा. एस. जे. कर्वे यांनी विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या सहकार्याबद्दल गणित विभागाच्या वतीने माननीय प्राचार्य तसेच सर्व सहकारी प्राध्यापकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
