
ध्येय गाठण्यासाठी जिद्द व चिकाटी सर्वांत महत्त्वाची…..
गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकोडे
महिला आत्मनिर्भरता म्हणजे केवळ स्त्रीची वैयक्तिक प्रगती नसून तो एका सशक्त आणि विकसित समाजाचा पाया आहे.ती कुटुंब व नव्या पिढीला घडविते.या महत्वपूर्ण भूमिकेमुळे आजच्या काळात महिलांचे सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरता ही काळाची गरज बनली आहे,असे सांगून जीवनात एक निश्चित असे ध्येय ठरवून ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम आणि जिद्द बाळगण्याची आवाहन गटविकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक डॉ.सोनिया नाकाडे यांनी केले.दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत वार्षिक गुणवत्ता,क्रीडा व सांस्कृतिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.प्रसंगी प्रमुख पाहूणे व अतिथी संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले यांच्या हस्ते ईशपूजन व दीपप्रज्वलनाने सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऋतुजा नाशिककर यांनी ईशस्तवन सादर केले.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांनी उपस्थित सर्वाचे स्वागत करुन प्रास्ताविकातून शाळेच्या वार्षिक शैक्षणिक प्रगतीचा अहवाल वाचन केले.प्रमुख पाहुण्यांचे परिचय उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.सोनिया नाकाडे यांचे बुके,शाल,श्रीफळ भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले,संस्थेच्या असि.सेक्रेटरी सरला तायडे,अधिक्षिका मीना वाळूंजे,शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांचेही यथोचित सन्मान करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळवण्यासाठी वर्षभर शाळेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा व उपक्रम यामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे अतिथी संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले व शाळेच्या अधिक्षिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मीना वाळूंजे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना ट्रॉफी,प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉ.सोनिया नाकाडे बोलतांना पुढे त्या म्हणाल्या,की शालेय जीवनापासून विद्यार्थिंनींनी थोरांचे आदर्श घेऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केले पाहिजे.त्यासाठी मला हे करायचंच आहे,असे ठरवून आणि जे आवडते त्यात आत्मविश्वास निर्माण करा.स्नेहसंमेलन म्हणजे मज्जाच मज्जा म्हणून ज्या गोष्टी जास्त आवडतात त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच चांगले संस्कार व चांगले विचार निर्माण करुन वाईट सवयी,सोशल मिडिया व आम्लीपदार्थापासून दूर राहून जास्तीत जास्त अभ्यास करून व कोणताही अवघड विषय समजून घेऊन सातत्याने वाचन करायला शिका.माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात वावरतांना स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून करिअर म्हणून ज्ञान वाढविण्यासाठी अभ्यासाच्या काही पद्धती,स्वतः च्या अनुभवातून आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन अन् पाठांतर न करता विषय समजून घेण्याची क्षमता स्वतः मध्ये असली पाहिजे.आणि एक चांगले आयुष्य स्वतःसाठी घडवा.तसेच आनंदी आयुष्याकरीता खूप शिका,खूप मोठे व्हा.आणि अडचणीवर मात करून मिळालेल्या संधीचे सोने करा,असे विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले शाळेच्या अधिक्षिका मीना वाळूंजे यांनी आयुष्यातील अनुभव सांगून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन पाश्चिमात्य शिक्षणाची कास न धरता भारतीय शिक्षणाची कास धरावी व शाळेतून चांगले संस्कार घ्यावे.तसेच खेळ,अभ्यासातून खूप मेहनत करुन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा.आणि देशाचे नांव उज्ज्वल करा,असे सांगितले.

पारितोषिक यादी वाचन पंकज अहिरे तर सांस्कृतिक कार्यक्रमाची यादी वाचन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रमुख निर्मला राठोड यांनी केले.सुत्रसंचालन गव्हर्निंग कौन्सिल सदस्या भारती चंद्रात्रे यांनी केले.तर आभारप्रदर्शन पारितोषिक समिती प्रमुख पुरुषोत्तम खैरनार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शालेय पदाधिकारी,सर्व समितीचे प्रमुख,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.ऋतुजा नाशिककर यांनी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने केली.
कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन,उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी,संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले,संस्थेच्या असि.सेक्रेटरी सरला तायडे,वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूलचे चेअरमन रमेश महाशब्दे मुख्याध्यापिका सविता कुशारे,उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी व मिलिंद कोठावदे, पर्यवेक्षिका सुषमा गवारे,गव्हर्निग कौन्सिल सदस्य कैलास बागुल,भारती चंद्रात्रे,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.फलकलेखन सायली मुळे यांनी केले.
