
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ पाटिल गायकर यांजकडुन-
गेली अडीच तीन दशके भाजपा व शिवसेनेचे बुलंद बालेकिल्ले म्हणुन ओळख असणारे ईगतपुरी व त्रंयबकेश्वर शहराचे अभेदय किल्ले भेदण्यात व त्यावर वर्चस्व मिळवण्यात स्थानिक नेत्याच्यां मदतीने आ.हिरामण खोसकर यांना प्रथमच यश लाभले आहे.या घवघवीत यशाने आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांचे व कार्यकर्त्याचें हौसले बुलंद झाले आहेत.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या अनोख्या युतीच्या नव्या समिकरणाने भाजप मात्र सत्ताधारी असुन ही येथील राजकारणात एकाकी पडतानां दिसुन येत आहे.
देशात, राज्यात, जिल्हयात व तालुक्यात सत्ता कोणाचीही असो ईगतपुरी शहर असेल वा त्रंबकेश्वर शहर या दोन्ही शहराचा निकाल हा कायम ठरलेलाच असे. दिग्गज नेत्यांनी जंग जंग पछाडुनही हे निकाल कधीच बदलले नाही हे विशेष.
ईगतपुरी शहर नगरपालिका निवडणुकीत सतत हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पाठिशी उभे राहते या मानसिकतेचा अचुक फायदा उचलत संजय इंदुलकर नावाच्या शिवसैनिकाने दहा पाच नाही तर तीस वर्ष या शहरावर विविध राजकिय खेळी करत वर्चस्व गाजवले.
मग यंदा संजय इंदुलकर कसे पडले ? ईगतपुरी शहराने हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विरोधात यंदा कौल दिला का ? तर याचे उत्तर आहे, इंदुलकर हे स्वत;च्या कर्माने पडले.आणि ईगतपुरी शहराने आपला कौल नेहमीचाच ठेवला.फक्त पर्याय बदलल्याने यंदा निकालात किंचित बदल झाला.
इंदुलकर यांनी उबाठा सोडण्याचा रास्त निर्णय घेतला खरा पण येथील मतदारानां गृहित धरुन ते भाजप मध्ये गेले. इंदुलकराचीं खेळी इथेच चुकली. कारण हे शहर सातत्याने मा. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर व शिवसेनेसोबत जोडलेले आहे.
इंदुलकर यांनी भाजप ऐवजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असता तर आज ते सत्तेत कायम दिसले असते.इथे त्यांची राजकिय खेळी सपशेल चुकली.
ज्या शिलेदाराच्यां बळावर इंदुलकर कायम सत्तेत असायचे त्यांचेत फुट पडुन ते शिवसेना शिंदे गटात गेल्याने इंदुलकर यांची ताकत खच्ची झाली. त्यातुन उमेदवार देतानांही धनदांडगे हा निकष लावल्याने मतदार नाराज झाला.
आमदार हिरामण खोसकर यांनी या संधीचा अचुक लाभ उठवला.त्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली.
नगराध्यक्ष पदाचा चेहरा शिवसेनेचा ठेऊन न.पा.मध्ये सर्वाधिक नगरसेवक पदाच्या जागा लढवण्याची खेळी आमदार हिरामण खोसकर यांनी केली.त्यांना रा.कॉ.चे प्रदेश चिटणीस गोरख बोडके, माजी जि.प.उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी जि.प.सदस्य अँड. संदिप गुळवे आदी नेत्यानीं पुरेपुर साथ दिली आणि निवडणुकीचा निकालच बदलला.
ईगतपुरी व त्रंयबकेश्वर दोन्ही शहरे नगरपालिका निवडणुकीत हिंदुत्ववादी विचाराचीं भक्कम पाठराखण करतात हे लक्षात घेऊन इंदुलकर यांना शिवसेनेच्या रुपाने तर त्रंबकेश्वर शहरात भाजपला शिवसेना शिंदे गटाचे रुपाने पर्याय देण्याची खेळी करत व सोबतीने रा.कॉ.ची पुरोगामी मते खेचत अनोखा विजय मिळवला.
भाजप साठी या दारुण पराभवाने एक संदेश दिला आहे. स्थानिक पातळीवर हिंदुत्ववादी विचारसरणीनां सोबत घ्या. अन्यथा जनता तुम्हालाही पर्याय देऊ शकते.
दरम्यान या दोन्ही न.पा. विजयाने आगामी जि.प., पं.स. निवडणुकीसाठी आमदार हिरामण खोसकर यांचे वारु सुसाट सुटणार आहे. शिवसेनेसोबतची रा.कॉ.ची युती यशस्वी ठरली असुन हाच प्रयोग सुरु राहिल का ? पराभवाने भाजपचे विमान जमिनीवर आले असेल तर स्थानिक पातळीवर ते आता जुळवुन घेणार का ? याकडे लक्ष लागुन आहे.
