
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१२८ वा दिवस
अत्यंत ओजस्वी आणि दृढ निश्चयाच्या काही प्रचारकांचीच मला सध्या जास्त आवश्यकता आहे. जिथे भिन्न भिन्न धर्माचा तुलनात्मक अभ्यास होईल, जिथे संस्कृत, वेदांत व वेदांतातील विभिन्न मते आणि काही पाश्चात्य भाषा शिकविण्याची ही व्यवस्था राहील असे एक महाविद्यालय मद्रास येथे स्थापन करावयास हवे. तसेच आपल्या हाताशी एक छापखाना असायला हवा. इंग्रजी व अन्य देशी भाषातील नियतकालिके ही देखील हवीत. हे तुम्ही प्रत्यक्षात उतरवाल तर तुम्ही काही केले असे मी म्हणेन. आपणही काही करायला तयार आहोत असे देशाने दाखवून द्यायला हवे. हिंदुस्थानात जर तुम्ही हे किंवा असेच काही करू शकत नसाल तर मग मला माझा मार्ग एकट्यानेच चोखाळू द्या.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष २ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५
★ विनायक चतुर्थी (अंगारक योग)
★ १९०२ भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिन
★ १९२१ बंगालमधील शांतिनिकेतन येथे ‘विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना झाली.
★ १९४० वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट’ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
★ २००४ भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचा स्मृतीदिन
★ किसान दिन…
