:

मंचावर उपस्थित डावीकडून
अनिल पाटील कुंदे, सुभाष सबनीस, वि. दा व्यवहारे, श्रीपाद कुलकर्णी, सोमनाथ पवार, वैजयंती सिन्नरकर, लेखिका डॉ मेघ जंगम. ॲड बाळासाहेब जंगम.
निफाड( प्रतिनिधी )~संत साहित्याची अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत तथापी डॉ. मेघा जंगम यांनी संस्कारधन या ग्रंथातुन संतांची चरित्र नाट्यरूपाने वाचकांसाठी उपलब्ध करून ही चरित्र पुन्हा जिवंत केली आहेत. संत साहित्याचा हा एक नवा आयाम रसिकांकडे खुला झाला आहे असे प्रतिपादन संत निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त आणि सचिव तथा उद्योजक हरिभक्त परायण श्रीपाद कुलकर्णी यांनी निफाड येथील सेवानिवृत्त शिक्षिका डॉ.मेघा जंगम बागले लिखित संस्कारधन या ग्रंथाचे प्रकाशन प्रसंगी केले. ते म्हणाले की निफाड ही नाथ संप्रदायाची भुमी असुन लेखिकेसारखी अनेक रत्ने येथे जन्माला आलेली आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैनतेय विद्यालयाचे विश्वस्त गुरुवर्य वि दा व्यवहारे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रकाशक सुभाष सबनीस, लेखक गीतकार सोमनाथ पवार, हरिभक्त परायण वैजयंती सिन्नरकर उपस्थित होते. प्रास्ताविक नवनाथ सुडके यांनी केले. या कार्यक्रमाला निफाडचे जिल्हा न्यायाधीश ए ए शेख, न्यायाधीश के आर जोगळेकर, न्यायाधीश ए आर गुन्नाल, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी स्नेहा देशपांडे,न्यायाधीश एस एस सुक्रे ,निफाड वकिल संघाचे अध्यक्ष ॲड प्रविण ठाकरे, उपाध्यक्ष ॲड रामनाथ सानप, सचिव ॲड रामनाथ शिंदे खजिनदार ॲड केशव शिंदे, ॲड मधुकर व्यवहारे, ॲड आप्पासाहेब निकम, ॲड इंद्रभान रायते , ॲड वाळिबा हाडपे, ॲड रमेश ठाकरे,ॲड अशोकराव घुगे. ॲड अमोल शिंदे, निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल पाटीलकुंदे, ॲड अण्णासाहेब भोसले, ॲड विजय मोगल, श्रीमाणकेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, सचिव बाळासाहेब कापसे, शिक्षक प्राथमिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष अर्जुन ताकाटे तसेच डॉ.कृष्णा यादव, लासलगाव बाजार समितीचे संचालक भिमराव काळे, जेष्ठ नेते शिवाजी ढेपले, शिक्षक समितीचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग कर्डिले, मुख्याध्यापक निलेश शिंदे,शिक्षक नेते रविन्द्र चव्हाणके, सुरेश धारराव, अश्विन तीर्थंकर, प्रमोद जंगम, किरण जंगम ॲड शुभम जंगम अनिकेत जंगम पत्रकार आणि निफाडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
