
सेलू (प्रतिनिधी). सातारा येथे दि.१ते ४ जानेवारीस होणाऱ्या ९९ व्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सेलू येथील ज्येष्ठ कवी तथा नूतन महाविद्यालयातील निवृत्त अधीक्षक श्री.गौतम सूर्यवंशी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी मिश्किलीकार श्री.अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक.२ जानेवारीस होणाऱ्या कविसंमेलनात त्यांचा सहभाग आहे.श्री.सूर्यवंशी हे सेलूतील नामांकित ज्येष्ठ कवी असून त्यांनी अखिल भारतीय संमेलनासह ,राज्य व विभागीय विविध स्तरावरील साहित्य व्यासपीठावरून आपल्या कविता प्रभावीपणे सादर केल्या आहेत. गायन,गीतकार,पत्रकारिता,संपादन, साहित्य,गझल कार्यशाळा, आदि क्षेत्रात सहभाग नोंदवित त्यांनी विविध सन्मान प्राप्त करीत आपला ठसा उमटविला आहे.विविध शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक व वित्तीय संस्थाशी ते संलग्न असून स्व.पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचेकडून त्यांच्या हिन्दी कवितेची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ.एस.एम.लोया, सचिव प्राचार्य डाॅ.विनायकराव कोठेकर प्रशासकीय अधिकारी तथा सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष डाॅ.शरद कुलकर्णी तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
