
मनमाड ( प्रतिनिधी):- मविप्र समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल मनमाड येथे गणिताचा महामेरू श्रीनिवास रामानुजन यांना अभिवादन
मुख्याध्यापिका शितल आहेर तसेच विद्यार्थाच्या ,सर्व उपस्थितांच्या हस्ते गणितीय जादुगार रामानुजन यांचे प्रतिमापुजन करण्यात आले.

शाळेच्या शिक्षिका आम्रपाली मोरे यांनी विद्यार्थ्यांना श्रीनिवास रामानुजन याच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली.हे भारताचे महान गणितज्ञ होते. .
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी कोइम्बतूरच्या इरोड गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कोमलताम्मल आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अयंगार होते. त्याच्या जन्मानंतर, संपूर्ण कुटुंब कुंभकोणममध्ये गेले, जेथे त्यांचे वडील श्रीनिवास यांनी पुढे त्यांच्या कौशल्यांसाठी त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली.

रामानुजन यांचे मन फक्त गणितात रमायचे. त्यांनी इतर विषयांकडे लक्ष दिले नाही. याचा परिणाम म्हणून त्यांना प्रथम शासकीय महाविद्यालय व नंतर मद्रास विद्यापीठाची शिष्यवृत्ती गमवावी लागली. हे सर्व असूनही त्यांचे मॅथ्सशी असलेले आकर्षण अजिबात कमी झाले नाही. १९११ मध्ये त्यांचा जर्नल ऑफ इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीमध्ये १७ पानांचा एक पेपर प्रकाशित झाला. १९१२ मध्ये रामानुजन यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली, पण तोपर्यंत त्यांना एक हुशार गणितज्ञ म्हणून मान्यता मिळाली होती. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

