

नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर चाकण मार्गेच,रेल्वे या विचार मंथन व पुढील दिशा ठरविणाऱ्या बैठीकीस सिन्नर मधून भाऊसाहेब शिंदे, महामित्र दत्ता वायचाळे,प्रा, राजाराम मुंगसे, कॉ, हरिभाऊ तांबे, दत्तात्रेय गवळी उपस्थित होते.
सिन्नर ( प्रतिनिधी )सिन्नर तालुक्यातून नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे सिन्नर तालुका भाजपा नेते उदय भाऊ सांगळे महामित्र दत्ता वायचळे कॉम्रेड हरिभाऊ तांबे भाजपा नेते भाऊसाहेब शिंदे प्राध्यापक मुंगसे सर भाजपा नेते नाशिक जिल्हा भाजपा कोषाध्यक्ष
दत्तात्रय गवळी_ सीमा उद्योग पदाधिकारी बबन राव वाजे यांसह नाशिक जिल्ह्यातील अनेक जण उपस्थित होते या विचार मंथन बैठकीत विद्यमान खासदार अमोल कोल्हे, खासदार, राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे ,आंबेगावचे देवदत्त निकम,
जुन्नर चे आमदार शरद दादा सोनवणे, माजी आमदार बेनके, सत्यजित शेठ शेरेकर ,अकोल्याचे आमदार किरण लआमटे
कॉ.अजित नवले संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या सुविद्य पत्नी सौ.खताळ सिन्नरचे नेते भाजपा नेते उदय भाऊ सांगळे अकोल्याचे कॉम्रेड कारभारी उगले बाजीराव दराडे, उत्कर्षा ताई रूपवते,आदींनी क्रांतिकारी विचार या मंथन बैठकीत मांडले व सर्वतोपरी मोठे आंदोलन उभे करून हा नाशिक पुणे रेल्वे मार्ग त्याला दिशा देण्याचे साठी एकत्रितपणे शासनाकडून हा प्रश्न सोडवून घेण्याचे ठरवले या विचार मंथन बैठकीत नाशिक नगर पुणे या तीनही जिल्ह्यात हा प्रकल्प लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल हा लढा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा असल्यामुळे सर्वांनी जीव ओतून हे आंदोलन यशस्वी करण्याचे ठरवले!
