
जातेगाव: येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय जातेगाव येते भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी आणि रामानुजन यांच्या कार्याची ओळख व्हावी, हा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. धुळे पी. के. यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.मुख्याध्यापक श्री. धुळे पी. के. यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “श्रीनिवास रामानुजन यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गणितात जागतिक स्तरावर मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांनी गणिताची भीती न बाळगता त्याकडे एक मनोरंजक विषय म्हणून पहावे.”विद्यालयातील गणित विषय शिक्षक श्री. मराठे एस. एम यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनातील विविध रंजक किस्से आणि त्यांनी शोधून काढलेली सूत्रे यावर प्रकाश टाकला. गणिताचा दैनंदिन जीवनातील वापर कसा वाढवावा, याचे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
