
नांदगाव ( प्रतिनिधी ) शिवसेना (शिंदे ) पक्षाचे सागर हिरे नांदगाव नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आले. या निवडणुकीत आमदार श्वास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दणदणीत विजय संपादन केला आहे शिवसेनेचे उमेदवार सागर मदनराव हिरे हे नगराध्यक्षपदावर निवडून आले असून त्यांच्या बरोबर आणखीन बारा नगरसेवकांनी विजय संपादन केला आहे यापूर्वी शिवसेनेचे सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते त्यामुळे नांदगाव नगरपालिकेत शिवसेनेचे एकूण 19 नगरसेवक निवडून आले आहेत याशिवाय एक अपक्ष उमेदवार ही निवडून आला आहे त्यामुळे नांदगाव नगरपालिकेवर शिवसेनेचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. निवडणूक निकालातून मतदारांनी शिवसेनेच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.
दरम्यान शिवसेना भाजप युतीतून भाजपाच्या वतीने निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार संजय सानप यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार काशिनाथ देशमुख यांनी विजय संपादन केला हे या निवडणुकीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
या निकालामुळे नांदगाव शहराच्या राजकारणात शिवसेना शिंदे गटाची ताकद अधिक भक्कम झाली असून आगामी काळात ती ताकद अधिक भक्कम होईल असे वाटते पुढील काळात नगरपालिकेत मार्फत विविध विकास कामांना गती दिली जाईल अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे नांदगाव पालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये प्रथमच एका पक्षाचे 19 उमेदवार निवडून आल्याचे एकमेव उदाहरणं सांगता येईल. राष्ट्रवादी काग्रेसचे उमेदवार राजेश बनकर यांना मोठा पराभव पत्कारावा लागला. या निवडणुकीत विरोधी पक्षाचा एकही नगर सेवक निवडून आला नाही. त्यामुळे नांदगाव नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष असणार नाही.

नांदगाव नगरपालिकेमध्ये निवडून आलेले नगरसेवक पदाचे उमेदवार पुढील प्रमाणे.
बाळासाहेब शेवरे, काका सोळसे, गायत्री शिंदे, कल्पना जगताप, पृथ्वीराज पाटील, सादिक शेख, रूपाली पाटील, स्नेहल पाटील, वाल्मीक टिळेकर, विद्या कसबे, राखी जाधव, राजेश शिंदे हे सर्व शिवसेना (शिंदे ) पक्षाचे उमेदवाचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. तर काशिनाथ देशमुख हे अपक्ष निवडून आले आहेत. तर नांदगाव नगरपालिकेच्या निवडणूक प्रसंगी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक पुढील प्रमाणे आहेत
खान जुबेदाबी गफार खान, कवडे वंदना चंद्रशेखर, देवरे किरण जयप्रकाश, कासलीवाल शोभा नेमीचंद, खरोटे योगिता सचिन, नावंदर स्वाती अमोल, पांडव दीपक प्रमोद
सागर हिरे हे आमदार सुहास कांदे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. त्यांच्या या निष्टेमुळेच आमदार सुहास कांदे यांनी सागर हिरे यांना नगराध्यक्षपदी एकहाती निवडुन आणले. सागर हिरे यांच्या विजयात आमदार सुहास अण्णा कांदे,सामाजिक कार्यकर्त्या अंजुमताई कांदे, फराहान दादा व शिवसेना (शिंदे) गट व युतितील भाजपा पक्ष तसेच इतर मित्रपक्ष आणि सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले
