
येवला ( प्रतिनिधी ) राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि येवला शहराचे भाग्यविधाते विकासपुरुष मा. ना. छगनराव भुजबळ साहेब यांनी येवल्यात केलेल्या विकासाला येवलेकरांनी भक्कम पाठिंबा दिला असून नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून येवलेकरांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. मा. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, रिपाई (आ.) व मित्रपक्ष महायुतीला येवला नगरपालिकेत मोठे यश प्राप्त झाले आहे.

नगराध्यक्षपदी पै. राजाभाऊ लोणारी यांचा ११६५ मताधिक्याने, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ११ व भाजपच्या ३ अशा महायुतीच्या एकूण १४ उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन शेख (प्र. १ ब), जयाबाई जाधव (५ अ), जावेद मोमीन (लखपती) (५ ब), लक्ष्मीबाई जावळे (६ अ), प्रविण बनकर (७ अ), दिपक लोणारी (८ ब), पारुल गुजराथी (१० अ), महेश काबरा (१० ब), कुणाल परदेशी (११ ब), शंकर (गोटू) मांजरे (१२ ब), चैताली शिंदे (१३ ब) आणि भाजपच्या छाया क्षीरसागर (८ अ), लक्ष्मी साबळे (१२ अ), पुष्पा गायकवाड (१३ अ) यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन! तसेच सर्व येवलेकरांचे व अविरत काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे देखील मनापासून आभार. यंदाच्या निवडणुकीत प्रकृतीच्या कारणास्तव मा. भुजबळ साहेब अनुपस्थित असल्याने सर्व निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीतील यश हे कार्यकर्त्यांच्या विशेष मेहनतीचे यश आहे.
आगामी काळात येवल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण अधिक प्राधान्य देणार असून विविध विकासाची कामे या पुढील काळात मार्गी लावली जातील. येवला शहर हे राज्यातील ‘रोड मॉडेल शहर’ म्हणून विकसित करण्यात येईल. महायुतीचा ‘वचननामा’ प्रत्यक्षात उतरवत येवला शहराच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सर्व विजयी उमेदवारांच्या हातून येवला शहराच्या विकासासाठी व येवलेकरांच्या हिताच्या दृष्टीने काम घडावे, यासाठी सर्वांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
