
जि. प. मॉडेल स्कूल, बारागांव पिंप्री येथे शैक्षणिक वर्षातील दुसरा पालक मेळावा काल सरपंच संध्या ताई कटके व शाळा समिती अध्यक्ष सागर उगले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.
यानंतर मुख्याध्यापक नवनाथ हांडगे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांची सुरक्षा, शाळेच्या भौतिक गरजा तसेच शालेय पोषण आहार याविषयी सविस्तर माहिती दिली. शिक्षक राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता तसेच सहलीचे महत्त्व याबाबत पालकांना मार्गदर्शन केले.

यावेळी पालकांच्या विविध समस्या जाणून घेत उपशिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी शाळेत सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.
या पालक मेळाव्यास शाळा समितीचे इतर सर्व सदस्य व विविध
कमिटीचे पदाधिकारी, पालकवर्ग तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक व शिक्षक यांच्यातील संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याची भावना अधिक दृढ झाल्याचे यावेळी दिसून आले.
