
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१२५ वा दिवस
जेव्हा एखादा कार्यकर्ता आपल्या क्षेत्रात कार्य करीत असेल तेव्हा त्याने आपल्या बहुतालच्या परिस्थिती विषयी सतत जागरूक असले पाहिजे तो जरी समाजासाठी आणि त्यांच्या जनजागृतीसाठी कार्य करीत असेल तरी त्याचे निरंतर शिक्षण, ज्ञानार्जन सातत्यपूर्ण राहिले पाहिजे. शिकविणे (अध्यापन) हे नेहमी शिकण्याशी (अध्ययनाशी) जोडले गेले आहे. शिक्षण एका बाजूला चालू नसेल तर त्याचे शिकविणे परिणामकारक होणार नाही. कामाला लागा सर्वांना आपल्या प्रेमाने जिंकून घ्या, विस्तारासाठी सर्वदा प्रयत्न करीत रहा गती व वाढ हेच जीवनाचे एकमेव रहस्य आहे हे ध्यानात ठेवा. भय कसले आणि कोणाला घ्यायचे, दृढ निश्चयाने कार्याला लागा.!
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ३० अग्रहायण शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २१ डिसेंबर २०२५
★ १९०९ मध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचे तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
★ १९९७ सुप्रसिध्द भावगीत लेखक “जनकवी” निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम यांचा स्मृतीदिन
★ २१ डिसेंबर वर्षातील सर्वात लघुत्तम दिवस.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
