
ओझर: दि.२० (वार्ताहर)
येथील ‘मविप्र’ संस्थेचे माधवराव बोरस्ते विद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थी पालकांची सहविचार सहविचार सभा मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रास्ताविक शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे ज्येष्ठ शिक्षिका रेखा देशमाने उपस्थित होत्या.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सोपान वाटपाडे यांनी, विद्यार्थी व पालकांना एनसीसीचे महत्व पटवून दिले. भारत राष्ट्र सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी व मेहनतीच्या बळावर पोलीस दल, संरक्षण दल, अकॅडमी, सामाजिक व खाजगी संस्थांमध्ये सुरक्षा ही काळाची गरज असल्याने एनएनसी मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी उपस्थित पालकांना सांगितले. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले. पालकांचे आभार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी मानले.
