
येवला (प्रकाश सांबरे यांचेकडुन )
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व नासिकच्या परिवर्त बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दोन दिवसीय परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उत्सवात संपन्न झाले.संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते संपन्न झाले.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समीक्षक व ख्यातनम वक्ते प्रा डॉ.सुधाकर शेलार उपस्थित होते. दि.१३ व १४ डिसेंबर रोजी हे संमेलन झाले.संमेलनाची सुरुवात मुक्तीभूमी येवला येथून संविधान प्रतीकृतीची रॅली काढून झाली.या रॅलीमध्ये ग्रंथांची पालखी, विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचा समावेश होता.उद्घाटन प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमाना पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाले.अंगणगाव (येवला येथील माय-बोली निवासी मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थीनीनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे गीत नृसाच्या माध्यमातून उत्कृष्ठ रित्या सादर केले तर सम कालीनतेचा लोकशाहीर प्रा.शरद शेजवळ यांनी दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमी वर हे गीत सादर करून संमेलनात चैतन्य निर्माण केले,प्रतिमापूजन प्रसंगी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. सुधाकर शेलार, संमेलन उद्घाटक पत्रकार संजय आवटे,स्वागताध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे,प्रमुख कार्यवाह तथा परिवर्त बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा.गंगाधर अहिरे,महाराष्ट्र राज्य साहित्त संस्कृती
मंडळाचे सदस्य विठ्ठल कदम,भरत गावडे यांच्यासह कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जेष्ठ कवी प्रकाश होळकर, परिवर्तन संस्थेचे सचिव दिनकर पवार,कोषाध्यक्ष प्रा.डॉ. धीरज झाल्ट,संयोजन समितीचे अध्यक्ष दिनकर दाणे,कार्यध्यक्ष मिलिंद गुंजाळ यांच्यासह येवला न.पा. चे मुख्याधिकारी तुषार आहेर उपस्थित होते.उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना संजय आवटे म्हणाले की विचार करायला लावणाऱ्या लेखक,कवी, साहित्यिकांची व्यवस्थेला भिती वाटत असते.लेखक कवींनी व्यवस्थेविरुद्ध स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे. भारतीय संविधानाने सर्व सामान्य माणसान केंद्रबिंदू मानलेले असून, आपले संविधान सामान्य माणसास अर्पण आहे.साहित्य संमेलनातून विचार पेरण्याचे काम झाले पाहिजे, नव्या पिढीशी संवाद वाढवणे गरजेचे आहे.घराच्या बाहेर आल्यावर प्रत्येकाचा ग्रंथ केवळ संविधान असला पाहिजे,प्रश्नांची उत्तरे शोधण्याची कुवत साहित्यात असली पाहिजे.संमेलनाध्यक्ष आपल्या मनोगतात म्हणाले की साहित्य संमेलना प्रमाणेच सामाजिक परिषदा समाजाच्या प्रश्नांसाठी आयोजीत केल्या पाहिजे,आपल्या देशातील अभ्यासक्रम रचनेत परिवर्तनाची प्रणाली फारसी मांडलेली नाही, सामाजिक प्रक्रिया शिक्षण क्षेत्रात प्रभावीपणे शिकवण्याची गरज आहे. भारताचे धर्मकारण १९५० मध्ये भारतीय संविधानाने बदलून टाकले आहे.आपल्या संविधानात मानवतेचा जागर केलेला आहे.परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे मुख्य वैशिष्टे म्हणजे बौद्धी वृक्षांस मान्यवरांच्या हस्ते जल अर्पण करून उदघाटन झाले.याप्रसंगी स्वागताध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले, त्यांच्या मनोगतात त्यांनी येवला शहराची सामाजिक,सांस्कृतीक , साहित्यिक परंपरा मोठी असल्याचे नमूद केले.येवले शहर हे चळवळीचे मोठे केंद्र असल्याचे सांगितले. संमेलनाची भूमिका प्रमुख कार्यवाह प्रा.गंगाधर आहिटे यांनी मांडली. भूमिका मांडताना आहिरे म्हणाले की साहित्य संमेलनात चांगल्या विचारांचा उत्सव झाला पाहिजे,माणसाच्या समस्या व दुःख आपल्या साहित्यातून मांडव्यात,माणसे जोडव्याचे काम परिवर्त संमेलनातून केले जात असते. विठ्ठल कदम यांनी आपल्या मनोगता तून सांगितले की माणसाने पुस्तकाशी व ग्रंथाशी एक नाते जोडले पाहिजे, साहित्त संमेलने सामाजिक उत्सव झाले पाहिजे,साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेत असल्याचे त्यांनी नमुद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर व प्रा.डॉ.धिरज झाल्टे यांनी केले तर आभार परिवर्त संस्थेचे सचिव दिनकर पवार यांनी मानले.संमेलनासाठी येवला तालुका व शहरातून मोठ्या प्रमाणात साहित्यप्रेमी रसिक उपस्थित होते.

दुसया दिवशी सुरुवातीस शाहीर दुष्णांत वाघ,शरद शेजवळ, आरती खरात व सहका-यांनी गाणी समतेची सादर करून महापुरुषांना कलेच्या माध्यमातून अभिवादन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता सामान्यसाठी उपकारक या विषयावरील परिसंवादात एरंडोल न.पा.चे मुख्याधिकारी अमोल बागुल,विनोद शिरसाट,राकेश वानखेडे,डॉ.प्रतिभा जाधव यांनी आपले विचार मांडले. संविधानीक मूल्यव्यवस्था – मराठी साहित्यातील प्रतिबिंब या विषयावरील प्रबोधन सत्रात प्रा.डॉ दादा गोरे,केशव देशमुख, प्राचार्य भास्कर पाटील यांनी मार्गदर्शन केले. कृषी व्यवस्थेतील स्थिती गती- साहित्यातील हुंकार या विषयावर डॉ. सतोष पद्माकर पवार यांनी आपले-विचार मांडले,लोककवी प्रशांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले.कवी संमेलनात लक्ष्मण बारहाते,अविनाश गायकवाड, काशिमाथ वेलदोडे,प्रदीप जाधव सोमदत्त मुंजवाडकर, यांच्यासह कवींनी कविता सादर केल्या.समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.जीभाऊ मोरे (कोपरगाव), राजा गायकवाड, मातिभूमी संस्थेचे अध्यक्ष आर.के. जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते,समारोप सत्रात डॉ. त्र्यंबक दुनबळे,कांता भालेराव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच,सविता धिवर यांना कार्यकर्ता सन्मान,प्रा.डॉ.अजय विभांडिक यांना अंधश्रद्धा निर्मूलन पुरस्कार,डॉ.विनायक गोरे यांना शेतकरी मित्र,शरद शेजवळ यांना प्रबोधन,सुधाकर गायकवाड यांना कलारत्न,बशीरभाई शेख यांना साहितरत्न,सुदर्शन खिल्लारे यांना पत्राकारिता सन्मान,डॉ.अमृतासा पहिलवान यांना शिक्षण प्रेमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

संमेलनातील ठराव कार्यवाह प्रा.गंगाधर अहिरे यांनी उपस्थितांपुढे सादर केले.समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गुंजाळ व पत्रकार प्रमोद पाटील यांनी केले तर आभार गोरख खराटे यांनी मानले. साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे,प्रमुख कार्यवाह प्रा.गंगाधर अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्त संस्थेचे सचिव प्राचार्य दिनकर पवार, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.धीरज झाल्टे, संयोजन समितीचे अध्यक्ष दिनकर दाने,बाबासाहेब कोकाटे,एड.दिलीप कुलकर्णी,नवनाथ शिंदे,रामनाथ पाटील,येवला तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष दीपक गरुड व त्यांचे पदाधिकारी,समता प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्य,चिचोंडी येथील साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे,प्रमोद पाटील यांच्यासह संयोजन समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक चे उपाध्यक्ष प्रकाशजी होळकर जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे व समवेत निफाड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नेते साहित्यिक शिवाजीराव दादा ढेपले सत्यशोधक चळवळीचे नेते भाई भगवान चित्ते साहित्यिक बशीर शेख पंडित मेहकर व विविध ठिकाणाहून आलेले साहित्यिक
