
ओझर ( वार्ताहर)येथील ‘मविप्र’ समाजाचे माधवराव बोरस्ते विद्यालयात विधान परिषद व मविप्रचे माजी सभापती कर्मवीर ॲड विठ्ठलराव हांडे यांच्या स्मृतिदिना निमित्त मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रस्ताविक शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कर्मवीर ॲड हांडे यांच्या जीवन कार्यावर भाषणे केली. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी नाशिक जिल्ह्यात मोलाचे कार्य त्यांनी केले असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात सोपान वाटपाडे यांनी सांगितले. फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम सविता पवार यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले
