
सिन्नर प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी) :- घोटी येथील जनता विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे भूतपूर्व सभापती कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन भामरे होते.व्यासपीठावर उपमुख्याध्यापक उल्हास पवार, पर्यवेक्षक हिरामण चौधरी,अविनाश निकम,हेमंत झोले ,नामदेव सरगर, अपर्णा उईके, अनिता राठोड, देवयानी जगताप, सोमनाथ गिरी आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते कर्मवीर ॲड. हांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ॲड यांच्या जीवन व कार्याविषयी तेजस्विनी साळवे विद्यार्थीनी माहिती दिली.

यावेळी बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन भामरे म्हणाले की, ॲडव्होकेट हांडे यांनी मविप्र संस्थेसाठी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे शेतीविषयक, सामाजिक,सहकार,राजकीय,शैक्षणिक आदींसह सर्वच क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा असे आव्हान मुख्याध्यापक भामरे यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी स्वानंदी जाधव हिने केले.तर आभार उपशिक्षिका वंदना जाधव यांनी मानले. यावेळीशिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
