
मविप्र संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त व १९७१भारत- पाक युध्दात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतांना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व सेवक वृंद.
नांदगाव –( प्रतिनिधी)– मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयामध्ये कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे साहेब यांचा पुण्यतिथी निमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन व १९७१ च्या युध्दात शहीद झालेल्या भारतमातेच्या विर जवानांना श्रद्धांजली अर्पण मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.

उपशिक्षिका सुनिता निकम यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे साहेब यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देताना म्हणाल्या की, कर्मवीर हांडे साहेबांनी ‘ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे’हे ध्येय समोर ठेवून त्यांनी संस्थेच्या शाळा, महाविद्यालय व वसतिगृहांचा ग्रामीण व आदिवासी भागात विस्तार केला.
इगतपुरी चा ‘भाग लढा’ हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना होय. तत्कालीन मुंबई राज्याच्या सरकारने गुजरातच्या शेतकऱ्यांना तांदळाचा भाव जास्त तर महाराष्ट्राचा शेतकऱ्यांना कमी भाव दिला. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला.
अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी कर्मवीर हांडे साहेबांचा जीवनप्रवास म्हणजे, कोणतेही श्रेय न घेता केवळ कार्य करत राहणे. निस्वार्थी सेवा, कठोर परिश्रम आणि शैक्षणिक कार्याप्रती असलेली निष्ठा यामुळे मविप्र संस्था आज लाखो विद्यार्थ्यांना आज ज्ञानदान करत आहे.
‘ विजय दिवस ‘ १९७१ च्या भारत- पाकिस्तान युध्दात भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या दिवस भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य, पराक्रम आणि बलिदान यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.
