
राज्य निवडणूक आयोगाची आज अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या महत्त्वाच्या टप्प्याच्या निवडणुकांची चर्चा आहे. याआधी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली तेव्हाच स्पष्ट केलं होतं की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन टप्प्यात होतील. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींची निवडणूक घेतली. या निवडणुकीचे निकाल येत्या 21 डिसेंबरला लागणार आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत.
सुप्रीम कोर्टाने याआधीच राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 च्या आधी निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर शहरांसह एकूण 29 महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत. पण आता या निवडणुका होणार आहेत.
निवडणुकांचा कार्यक्रम:
“29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 असणार आहे. या नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025 ला होणार आहे. उमेदवारी माघारीची मुदत ही 2 जानेवारी 2026 अशी असणार आहे. तर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026 ला होईल. या महापालिकांसाठी मतदान 15 जानेवारी होईल. तर 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होईल”, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
विभागवार महापालिकांची नावे
मुंबई MMRDA विभाग :
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
कल्याण-डोंबिवली
वसई-विरार
भिवंडी
मीरा-भाईंदर
उल्हासनगर
पनवेल
पश्चिम महाराष्ट्र विभाग:
पुणे
पिंपरी-चिंचवड
कोल्हापूर
सांगली
सोलापूर
इचलकरंजी
उत्तर महाराष्ट्र विभाग :
नाशिक
अहिल्यानगर
धुळे
जळगाव
मालेगाव
मराठवाडा विभाग :
छत्रपती संभाजीनगर
लातूर
नांदेड-वाघाडा
परभणी
जालना
विदर्भ विभाग :
नागपूर
अकोला
अमरावती
चंद्रपूर
