

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१२१ वा दिवस
हिंदुस्तानच्या दैदिप्त्यमान इतिहासात, विविध शास्त्रीय ग्रंथरचनातील ओळीओळींतून आपल्याला जे दर्शन होते ते एक विराट मानवसमूह, संस्कृतीची पहाट होण्याच्याही पूर्वी जी प्रगती झाली होती त्यांचे निसर्गाशी झालेल्या अनेक युद्धांमध्ये त्यांनी मिळविलेल्या विजयाच्या लक्षावधी ध्वजा डौलाने फडकत होत्या. त्या ध्वजा अलीकडे प्रतिकूल परिस्थितीच्या झंजावात फाटून-तुटून गेल्या असल्या तरी, काळाच्या ओघात जीर्ण-शीर्ण झालेल्या असल्या तरी प्राचीन हिंदुस्तानची विजयगाथा त्या आजही तेवढ्याच अभिमानाने सांगत आहेत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २५ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १६ डिसेंबर २०२५
★ १९०३ मुंबई स्थित गेट वे ऑफ इंडियाच्या समोर ५६५ कक्ष असलेल्या पंचतारांकित ताजमहाल पॅलेस हाॅटेलचे उद्घाटन
★ १९७१ भारतीय सैन्यदलाचा “विजय दिन” (भारत -पाक युध्दात, पाक सैन्याची शरणागती)
★ १९७१ बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन.
★ १९८५ कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिॲक्टर राष्ट्राला समर्पित.
★ २००४ सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
