
मुक्ताताई नगर : (बबनराव वि. आराख)
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचा १६ वा वर्धापन दिन दिनांक २८डिसेंबर २०२५ रोजी मुक्ताईनगर येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे याप्रसंगी राज्यातील आदर्श प्राचार्य,आदर्श मुख्याध्यापक आदर्श ,प्राध्यापक, आदर्श शिक्षक,आदर्श पत्रकार, आदर्श समाजसेवक आदर्श वक्ता व निवेदक अशा ७५ मान्यवर पुरस्कारार्थींना तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यातील विविध विद्यालयातील इयत्ता १० वी व १२ वीच्या ८५ विद्यार्थ्यांचा सुद्धा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी तथा अमळनेर येथील सुप्रसिद्ध कवी तथा साहित्यिक प्रा. वा.ना.आंधळे असुन या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथील प्रा.डॉ.सुभाष बागल यांच्या शुभहस्ते होणार आहे या सोहळ्यासाठी केंद्रीय क्रीडा युवा राज्यमंत्री भारत सरकार मा.खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार श्री चंद्रकांतभाऊ पाटील जिल्हा परिषद जळगावचे माजी अध्यक्ष श्री अशोकभाऊ कांडेलकर मा.डॉ.जगदीश दादा पाटील मुक्ताईनगर नगरपालिकेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा मा.नजमाताई इरफान तडवी, दैनिक देशोन्नती बुलढाणा जिल्हा आवृत्तीचे संपादक डॉ.राजेश राजोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून तालुका स्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी जळगावचे माजी अध्यक्ष तथा शिक्षक नेते श्री एस.डी.भिरुड सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित असून या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी, लेखक तथा उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सल्लागार छत्रपती संभाजीनगर येथील माजी प्राचार्य डी.बी. जगतपुरिया यांच्या शुभहस्ते होणार आहे याप्रसंगी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन मा.अँड सौ. रोहिणीताई खडसे. खेवलकर सेवानिवृत्त अधिकारी डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील मलकापूर येथील श्री मनोहर गलवाडे मुक्ताईनगर येथील सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ.एन.जी.मराठे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर याप्रसंगी उपस्थिती असेल असे उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.
