
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक वतीने ४७ वी कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन सोहळा मंगळवार दि.१६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वा व्ही. जे. हायस्कुल , नांदगाव येथे संपन्न होणार आहे अशी माहिती सेक्रेटरी आश्विनीकुमार येवला यांनी दिली. या उद्घाटन सोहळाच्या अध्यक्ष स्थान संस्थेचे कार्याध्यक्ष मारुती कुलकर्णी भूषविणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते , निर्माते माजी विद्यार्थी योगेश मधुकर निकम उपस्थित राहणार आहेत व याच दिवशी नांदगाव संकुलातील पाच एकांकिका सादर होणार आहे त्यानंतर सिन्नर,इगतपुरी,नाशिक येथे या स्पर्धा होतील व अंतिम फेरी २४ डिसेंबर रोजी नाशिकरोड संकुलात संपन्न होणार आहेत , या कार्यक्रमासाठी व एकांकिका पाहण्यासाठी उपस्थित रहाणेचे आवाहान करण्यात येत आहे .
