
सिन्नर (प्रतिनिधी ) १३ डिसेंबर २०२५ ज्येष्ठ समाजसेवक कृतिशील सत्यशोधक दिवंगत डाॅ.बाबा आढाव यांची अभिवादन सभा राष्ट्रसेवा दल व समविचारी संघटना सिन्नर यांच्या वतीने हुतात्मा स्मारक आडवा फाटा सिन्नर येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी दिवंगत डाॅ.बाबा आढाव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले

यावेळी महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की. दिवंगत बाबासाहेब पांडुरंग आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे एक ज्येष्ठ समाजसेवक असून, सत्यशोधक तसेच शिव,शाहू ,फुले, आंबेडकर विचारचे अनुयायी होते. ज्येष्ठ समाजसेवक कृतिशील सत्यशोधक डाॅ.बाबा आढाव यांचे सामाजिक क्षेत्रातील ऐतिहासिक कार्य लक्षात घेऊन त्यानां महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात यावे असे आवाहन महामित्र दत्ता वायचळे यांनी या प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले व महामित्र परिवार च्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
काॅम्रेड हरिभाऊ तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यात म्हणाले की
डाॅ.बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित कष्टकरी विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केले. अशा महान समाजसेवक दिवंगत डाॅ बाबा आढाव यांना सिटू परिवार वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली
आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गोरगरीब कष्टकरीचे नेते दिवंगत डाॅ बाबा आढाव यांनी त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘हमाल पंचायती’ची स्थापना,केली त्यामुळे त्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले.अशा समाजसेवक निसर्गवासी डाॅ बाबा आढाव यांना आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
शेतकरी संघटनेचे नेते डाॅ.आर टी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की.जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले.दिवंगत डाॅ.बाबा आढाव यांची एक विचार श्रेणी सत्यशोधक विचारवंत होती.त्यानी महिला, समता, कष्टकरी, जातीचा मुद्दा आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आयुष्यभर लढा दिला. अशा महान समाजसेवक दिवंगत डाॅ. बाबा आढाव यांना शेतकरी संघटनाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली
अनिल चव्हाण ( भाटजिरे) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की दिवंगत डाॅ बाबा आढाव क्रांतिकारक सत्यशोधक परंपरेचे मोठे पाईक होते. त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तनाचा मोठा लढा चालवला. ते एक कृतिशील विचारवं होते. महाराष्ट्राच्या वाटचालीत त्यांच्या कामाचं योगदान मोठं होतं.अशा महान समाजसेवक भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली
अनिल काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जनतेच्या हितासाठी विशेषतः हमाल, रिक्षाचालक, कामगार, कष्टकरी आणि वंचित समूहाच्या उत्थानासाठी कार्यरत होते. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करीत होते या सर्वांसाठी बाबा आढाव हे मोठा आधार होते.अशा महान समाजसेवक दिवंगत डाॅ.बाबा आढाव याना संताजी नागरी पंतसंस्थ सिन्नर वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली
बंडूनाना भाबड संचालक सहकार्य भाऊसाहेब थोरात सह साखर कारखाना संगमनेर यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली
अभिवादन करण्यासाठी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे,काॅम्रेड हरिभाऊ तांबे आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे बंडूनाना भाबड, अनिल चव्हाण (भाटजिरे) डाॅ.आर टी जाधव अनिल काळे, सचिन शिरसाठ संदिप मुठे शाम डांगे आकाश धोंगडे आदि उपस्थित होते
