मातोश्री चांडक कन्या विद्यालय आणि ब.ना.सारडा विद्यालय येथे कै.गजानन निकम यांच्या स्मरणार्थ होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले.
मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांचा आरोग्यदायी दिनक्रम घडावा,या प्रेरणेने कैलास क्षत्रिय व त्यांचे पुत्र प्रतिक क्षत्रिय यांनी कै.गजानन निकम यांच्या स्मरणार्थ ही 'स्नेहभेट' विद्यार्थ्यांना दिली.या सर्व दानशूर व्यक्तिमत्त्वांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दर्जेदार टिफिन बॉक्स देण्यात आले.उपक्रमासाठी मा.बापूसाहेब पंडित यांनी विशेष पुढाकार घेतला.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले,पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे शिक्षक प्रतिनिधी उत्तम भोये उपस्थित होते.
पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालत सामाजिक बांधिलकी जपणारा असा उपक्रम भविष्यातही राबवावा,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.