
नाशिक जिल्ह्यातील जाखोरी (ता. जि. नाशिक) येथे गेल्या 8 वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या “विचारक्रांती युवा वक्ता” या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवार, दिनांक 11 जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. सदर स्पर्धा सकाळी 9 वाजता सुरू होणार असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेस लाभत असतो.
स्पर्धेचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये समाजाभिमुख विचार, प्रभावी अभिव्यक्ती, तार्किक मांडणी व नेतृत्वगुण विकसित करून जबाबदार नागरिक घडवणे हा आहे.
स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेतः
- लोकशाहीचे वस्त्रहरण: कोसळते स्तंभ-न्याय, माध्यम, जनता की लोकशाही
- जेव्हा तंत्रज्ञान परंपरेला भेटते : बदल, संघर्ष आणि सहजीवन
- “स्त्री” – समाजाच्या परिवर्तनाची जननी
- आयुष्याचा हा सुंदर खेळ पुन्हा नाही…
- भारताची बांधणी – अर्थव्यवस्था, संस्कृती आणि भूगोलाच्या माध्यमातून
- कोणतीही दिशाभूल देखणी असावी लागते…
- वारकरी संत: महाराष्ट्रधर्म घडला तुम्हा कारणे
स्पर्धेत उत्कृष्ट वक्तृत्व सादर करणाऱ्या स्पर्धक व संघांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून —
🥇 प्रथम क्रमांक: रोख 7000 रुपये व स्मृतिचिन्ह
🥈 द्वितीय क्रमांक: रोख 5000 रुपये व स्मृतिचिन्ह
🥉 तृतीय क्रमांक: रोख 3000 रुपये व स्मृतिचिन्ह
चतुर्थ क्रमांक: रोख 2000 रुपये व स्मृतिचिन्ह
सांघिक पारितोषिक – रोख 3000 रुपये व विचारक्रांती करंडक
तसेच 1000 रुपयांची 5 उत्तेजनार्थ व विशेष पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा इयत्ता 10 वी पासून ते वय वर्ष 26 पर्यंत खुली असून सदर स्पर्धेत एका कॉलेजचे दोन विद्यार्थी संघ म्हणून ही आपली नावनोंदणी करू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी असे आवाहन मा. श्री. डॉ आश्विनीकुमार भारद्वाज, महाराष्ट्र माझा परिवार चे संस्थापक विकास भागवत, मा. श्री. विश्वास कळमकर, जाखोरी उपसरपंच मा. श्री. राहुल धात्रक,
जाखोरी सरपंच मा.श्री. नितीन कळमकर , विचारक्रांती वाचनालय अध्यक्ष सुहास खाडे, सचिव देविदास रजपूत ह्यांच्या कडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
📞8411816162
📞 7507262040
