
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१२० वा दिवस

आदर्श शिक्षक, व रयत शिक्षण संस्थेचे माजी उत्तर विभागिय सल्लागार कै.माधवराव शंकरराव नारायणे गुरुजी यांचा जन्मदिवस
श्रेष्ठतम वीरवृत्ती म्हणजे सामान्यातील सामान्य लोकांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांची निःस्वार्थपणे सेवा करणे, नेहमी संयमी वृत्ती बाळगणे. कोणत्याही परिस्थितीत क्रोधीत न होता, संयमी जीवन जगणे होय. वीरवृत्ती म्हणजे निःशेष आत्मसमर्पण ! आपल्या क्रोधावर विजय मिळवणे हे सर्वात महान वीराचे आभूषण आहे. आज्ञा होताच पुढे सरसावून इष्ट कार्यासाठी स्वतःच्या प्राणार्पणासाठी सदैव सिद्ध असणारा नेताच इतरांना जीवन समर्पण करण्याची आज्ञा देऊ शकतो. प्रथमतः स्वतः आत्मसमर्पण केले पाहिजे. तदनंतरच इतरांना उपदेश करण्याचा अधिकार आपणास प्राप्त होतो. जो अंतःकरणपूर्वक सर्वांचा होऊ शकतो, तोच खरा वीर नेता होय.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २४ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १५ डिसेंबर २०२५
★ सफला एकादशी 🚩🚩🚩🚩🚩★ आदर्श शिक्षक व रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागिय सल्लागार माधवराव शंकरराव नारायणे गुरुजी, यांचा जन्मदिवस
★ देवमामलेदार यशवंतराव महाराज पुण्यतिथी, रथोत्सव व यात्रोत्सव बागलाण (सटाणा)
★ १७४९ छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी.
★ १९३२ कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी तथा निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांची जन्मदिन
★ १९५० सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्मृतीदिन.
★ आंतरराष्ट्रीय चहा दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
