
नांदगाव (प्रतिनिधी)-शनिवार, दिनांक-१३/१२/२०२५ रोजी सकाळी १०. ०० वाजता ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नांदगाव, तालुका-नांदगाव, जिल्हा- नाशिक या महाविद्यालयात बी एड अभ्यासक्रमांतर्गत आरोग्य व योगशिक्षण याविषयी मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. लोकेश गळदगे सर यांनी बी एड प्रशिक्षणार्थी विद्यार्थी शिक्षकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले त्याचबरोबर योगा विषयक कृती करून घेतल्या, महाविद्यालयातील जवळपास १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या आरोग्यविषयक शिबिराचा लाभ घेतला, एकाग्रतेसाठी योग शिक्षण कसे महत्त्वाचे आहे याविषयी महाविद्यालयाचे प्रा. रविंद्र सुरसे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी संस्थेचे सरचिटणीस मा. रमेश आप्पासाहेब पगार व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विक्रम घुगे उपस्थित होते, प्रा. मीरा कांबळे मॅडम, प्रा. किरण पवार सर, प्रा. मोरे सर,प्रा. देहाडराय मॅडम, प्रा. जगताप मॅडम यांनी आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले,
